DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mahavachan Utsav Upkram Google Form Link

Mahavachan Utsav Upkram Google Form Link

सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम 

कालावधी - दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.
महवाचन उस्तव २०२४ अंतर्गत आपल्याला 


या वेब एप्लिकेशन्स वर आपली शाळांनी माहिती भरायची आहे. 
याकरिता 
१. शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी. 
२. यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे. 
३. त्या युजर id आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे. 
४. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनास्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.

हेही वाचाल -

समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

प्रति,
जा.क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२१०/२५1333

दि. 19 APR 2024

१) शिक्षणाधिकारी (प्राथ)/ (माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.
२) प्रशासनाधिकारी, सर्व महानगरपालिका.

विषय :- राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' माहिती संकलित करण्याबाबत.

संदर्भ : - १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र. ३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.
२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.
४. या कार्यालयाचे पत्र क्र.मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/३६२ दि.०२/०२/२४.
५. या कार्यालयाचे पत्र क्र.मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/४४१ दि.०९/०२/२४.

    महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.

    राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.३ अन्वये अवगत करण्यात आले होते. सदर पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करून शाळेच्या मुख्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्याथ्याँकडून एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी १०२४ पर्यंत गट शिक्षणाणिकारी यांच्याकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

    त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्यांची माहिती भरण्याकरीता Google link देण्यात आली होती. या Google link मध्ये माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्याबाबत सूचना 
संदभर्भीय पत्र क्र. ४ अन्वये देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी शाळा व सहभागी विद्यार्थी संख्या दर्शविणारी link मधील माहिती सोबत जोडण्यात येत आहे.तरी, आपल्या जिल्ह्यास / महानगरपालिकेस वारंवार या कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे / Whatapp द्वारे / VC द्वारे माहिती भरण्याबाबत सूचना देऊनही आपल्या जिल्ह्यातील माहिती दिलेल्या Link भरण्यात आली नाही. आपल्या जिल्ह्याची / महानगरपालिका यांची माहिती असमाधानकारक असून आपणांस दि. २४/०४/२०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. याकरीता आपण व्यक्तीशः लक्ष घालून दि. २४/०४/२०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाची माहिती शाळांकडून संकलित करुन Link मध्ये अचूक माहिती भरावी.

(समीर सावंत)
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन) 
म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव रवानाः- 
१. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

👇👇👇👇👇


निपुण भारत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग 
समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई

जा.क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/362

प्रति,
दि. - 2 FEB 2024

शिक्षणाधिकारी (प्राथ)/ (माध्यमिक),
जिल्हा परिषद,
सर्व जिल्हे.

विषय :- 'महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.

संदर्भ :- १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/एसडी-४ दि. २२/११/२०२३.
२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.

    महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.

    राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये अवगत करण्यात आले होते.

    त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याचा तपशिल या कार्यालयास उलट टपाली कळविण्यात यावा. तसेच या सोबत Google forms Link 

गुगल फॉर्म भरून देण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला स्पर्श करा



देण्यात येत आहे. यात अचूक माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्यात यावी.

(संजय डोर्लीकर) उप संचालक (प्रकल्प /प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव रवाना:-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२. आयुक्त (शिक्षण), महानगरपालिका, सर्व.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
४. प्रशासन अधिकारी (शिक्षण)/ शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व.
५. शिक्षण निरिक्षक, (उत्तर / दक्षिण/पश्चिम), मुंबई.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४.
टेलिफोन नं.: ०२२-२३६३ ६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४ D:\Kedare\202324\MAHARASHTRA MAGHAL GALMALALENTERidderdu.gov.in 

संकेतस्थळ - 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon