DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Toll Free Helpline 181 Number for Women


The state government of Maharashtra announced a toll-free helpline 181 for women across the Maharashtra state. The helpline will be operational in two weeks. It will be available on all days of the week, 24 hours of the day. 

The state government of Maharashtra announced a toll-free helpline 181 for women across the state.


राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी १८१ या क्रमांकाची टोल फ्री १८१ महिला हेल्पलाईन" स्वतंत्रपणे सुरु करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन शुध्दीपत्रक क्रमांक- संकीर्ण २०२२/प्र.क्र.९७/कार्या-२, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक:- ०६ फेब्रुवारी, २०२४.

संदर्भ :
१) सह सचिव, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय, नवि दिल्ली यांचे अ.शा. पत्र क्र.WW- २३/१/२०२१-WW Dated: १४th July, २०२२ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना.
२) शासन परिपत्रक, महिला व बाल विकास विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३०७/कार्या-२, दि.०३.०१.२०२३.
३) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक- संकीर्ण २०२२/प्र.क्र.९७/का.२,
दि.१२/१/२०२३. ४) सह सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार याचे पत्र दि.०६.०९.२०२३.

प्रस्तावना:
केंद्र शासन पुरस्कृत "मिशन शक्ती" या योजनेच्या केंद्र शासनाने दिनांक १४ जुलै, २०२२ च्या पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भ क्रमांक २ येथील शासन परिपत्रक दि.०३.०१.२०२३ अन्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून राज्यात लागू करण्यात आल्या आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या "मिशन शक्ती" योजनेतंर्गत "संबल" या उपयोजनेतील राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळण्यासाठी १८१ या क्रमांकाची स्वतंत्र टोल फ्री १८१ महिला हेल्पलाईन" स्वंतत्ररित्या सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय दि.१२.०१.२०२३ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
उपरोक्त नमूद हेल्पलाईन कार्यान्वित करण्याबाबत व त्यातील तांत्रीक बाबीं विषयीची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने Centre for Development of Advanced Computing (C-DAC) या संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सी-डॅक संस्थेच्या प्रतिनिधींनीनी हेल्पलाईनसाठी लागणारे संगणकीय कार्यप्रणाली (Software), कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व त्यानुषंगीक सेवा, राज्यातील संस्था, कार्यालये, योजना, संपर्क व्यक्ती, तज्ञ व्यक्ती, संघटना इत्यादिंशी संपर्क करण्यासंबंधीचे व त्याबाबतची कार्यप्रणाली विकसीत करण्याचे कार्य सी-डॅक या संस्थेमार्फत विकसीत करुन पुरविण्यात येणार आहे व त्यासाठीचा खर्च सी-डॅक संस्थेस केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार आहे. तसेच, सदर १८१ महिला हेल्पलाईन" या घटक योजनेच्या कार्यवाहीबाबत मानक कार्यप्रणाली (Standard operating procedure) संदर्भ कमांक ४ येथील पत्रान्वये निर्गमित करण्यात आली आहे. सबब, संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णय दि.१२.०१.२०२३ मधील परिच्छेद क्र.९ येथील "१८१ महिला हेल्पलाईन" करीता संस्थेची निवड ही महिला व बाल विकास विभागामार्फत Gem पोर्टलवरुन RFP पध्दतीने करण्यात येईल. सदर हेल्पलाईनसाठी सुविधा पुरविणाऱ्या संस्थेची निवड, मनुष्यबळ, दैनंदिन कामकाज, संस्थेची देयके इ. बाबतच्या अटी व शर्ती निविदेत नमूद करण्यात येतील." ही बाब वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक :-

संदर्भ क्रमांक ३ येथील दि.१२.०१.२०२३ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.९ येथील १८१ महिला हेल्पलाईन" करीता संस्थेची निवड ही महिला व बाल विकास विभागामार्फत Gem पोर्टलवरुन RFP पध्दतीने करण्यात येईल. सदर हेल्पलाईनसाठी सुविधा पुरविणाऱ्या संस्थेची निवड, मनुष्यबळ, दैनंदिन कामकाज, संस्थेची देयके इ. बाबतच्या अटी व शर्ती निविदेत नमूद करण्यात येतील." ही बाब वगळण्यात येत आहे.

त्याऐवजी

"केंद्रपुरस्कृत "मिशनशक्ती" या योजनेच्या "१८१ महिला हेल्पलाईन" या घटक योजनेंतर्गत काम करण्यासाठी कायमस्वरुपी कोणतीही पदे निर्माण करण्यात येणार नाहीत. या योजनेसाठी आवश्यक असलेले कंत्राटी मनुष्यबळ, त्यांची पात्रता व त्यासंबंधीत इतर बाबी "मिशन शक्ती" या एकछत्री योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानुसार असेल. या घटक योजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व कंत्राटी स्वरुपातील कर्मचारी वर्गाची निविदा प्रक्रिया राबवून बाह्यस्त्रोताव्दारे भरण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे." असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या CLICK HERE  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०२०६१६५६४१३५३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्र.वि.कुलकर्णी) 
अवर सचिव, महाराष्ट्र शासन


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon