DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Employees are Exempted in BLO Duty GR

Employees are Exempted in BLO Duty


महाराष्ट्र शासन 
ग्राम विकास विभाग, 
बांधकाम भवन, 
मुंबई-४०० ००१.

दुरावनी क. ०२२-२२८३९९२४

ई मेल: sopr3.rdd-mh@nic.in

क्रमांक संकिर्ण २०२४/प्र.क्र. ०६/पं.रा.-२

दिनांक: २ फेब्रुवारी, २०२४

प्रति,

सर्व जिल्हाधिकारी, 
(जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळून)

विषय :- ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गास मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नेमणूक न देता ग्रामपंचायत कर्मचा-यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करणेबाबत

संदर्भ :- श्री. संजीव निकम, राज्य सरचिटणीस/राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचेकडील दिनांक ०९.०१.२०२४ रोजीचे पत्र

महोदय,

    उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी संवर्गास मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नेमणूक न देता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करणेबाबतचे श्री. संजीव निकम, राज्य सरचिटणीस/राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांनी कळविले आहे.
    सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक ईएलआर-२०२३/प्र.क्र. ३८७/२३/३३, दिनांक ७ जून, २०२३ अन्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम करण्यास कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. सदर शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने श्री. संजीव निकम, राज्य सरचिटणीस/राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचे पत्र आवश्यक त्या कार्यवाहीसाठी आपल्या कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे.

सहपत्रः- वरीलप्रमाणे

आपला,

(बा.म.आसोले) 
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

या कर्मचाऱ्यांना दिली निवडणुकीचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

या कर्मचाऱ्यांना दिली जनगणनेचे कामात सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

यांना दिली टोल सुट देण्याबाबत शासन निर्णय वाचा किंवा पीडीफ मध्ये डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon