DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISE Plus STUDENTS TEACHERS AADHAAR VALIDATION



महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व किडा विभाग
निपुण भारत
अमृत महोत्सव
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२३-२४/258
दिनांक : 24/01/2024

प्रति,
१. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद (सर्व).
२. शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.
३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई

विषयः सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम पूर्ण करणे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करणेबाबत.

संदर्भ: 
१) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार याचे पत्र क्र. D.O.No.२३-४/२०२३ Stats दि. २५/०८/२०२३.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.२७०/एसडी-१ दि. ३०/०८/२०२३.
३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२३- २४/२५९१, दि.१३/०९/२०२३

    उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील सर्व शाळांनी सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम १००% करणेबाबत आपण पत्राव्दारे, Zoom Meeting घेऊन व व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार कळविण्यात आले आहे.तरी देखील राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील युडायस प्लसची माहिती संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही पूर्ण केलेली नाही.
    राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. परंतू Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या

मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४

    पर्यंत पूर्ण करून घ्यावे. आपणास ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करण्याकरिता कळविण्यात आले आहे मात्र अनेक शाळांचा ड्रॉप बॉक्स अद्यापही शून्य झालेला दिसत नाही यासाठी आपल्या स्तरावरून कॅम्प घेऊन मुख्याध्यापकांकडून ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी त्वरित कमी करून घ्यावे अन्यथा आपल्या जिल्हयाच्या Performance Grading Index गुणांवर याचा विपरित परिणाम होईल त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक निर्देशकांमध्ये (PGI) घट होईल.

याशिवाय केंद्र शासनाच्या दि.२२ जानेवारी, २०२४ च्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

सन २०२३-२४ करिता युडायस प्लस डेटाचा स्नॅपशॉट दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता घेण्यात येईल.

दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी डेटा पूर्ण करण्याच्या व तपासून खात्री करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

उपरोक्त सूचनांनुसार दि. ३१ जानेवारी, २०२४ रोजीचा युडायस प्लस डेटा प्रमाणित करणेकरिता वापर करण्यात येईल.

ज्या शाळांचा डेटा अपूर्ण भरलेला असेल त्या शाळांचा संपूर्ण डेटा दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर सिस्टीमद्वारे पूर्णपणे डिलिट करण्यात येईल.

दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर डेटामधील कोणतेही बदल अॅप्लिकेशन रिअल टाइममध्ये अपडेट होईल. परंतु सन २०२३-२४ च्या डेटासाठी सदर अपडेट विचारात घेतले जाणार नाही.

युडायस प्लस डेटामध्ये कोणतेही बदल तांत्रिक टीमद्वारे दि. ३१ जानेवारी, २०२४ नंतर केले जाणार नाहीत.

तरी आपल्या स्तरावरून दि. ३१ जानेवारी, २०२४ पूर्वी मुख्याध्यापकांकडून युडायस प्लस सन २०२३-२४ पोर्टलवरील संपूर्ण डेटा भरून घ्यावा,

1.School Profile Status as on dt.23/01/2024

सोबत:
2. Teacher Profile Status as on dt.23/01/2024
3. Student Profile Status as on dt. 23/01/2024
4. Student Adhar Validation Status as on dt. 23/01/2024
5. Teacher Adhar Validation Status as on dt.23/01/2024 6. Drop Box Status Std. 1 to 12 as on dt.23/01/2024

समीर सावंत
( राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशा.) 
म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहिती व कार्यवाहीस्तव सविनय सादरः
१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.


Also read

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

निपुण भारत

अमृत महोत्सव

समग्र शिक्षा

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२३-२४/२५0

प्रति,

दिनांक : 19/01/2024

१. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद (सर्व).

२. शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.

३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई

विषयः सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलीडेशन करून घेणेबाबत.

संदर्भ

: १) स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार याचे पत्र क्र. D.O.No.२३-४/२०२३ Stats दि. २५/०८/२०२३.

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.२७०/एसडी-१ दि. ३०/०८/२०२३.

३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२३- २४/२५९१, दि.१३/०९/२०२३

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये या कार्यालयाकडून राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणेबाबत व्हीसी व व्हाट्सअॅपव्दारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय Adhar Validation Report नियमितपणे पाठविण्यात येत आहे. तरी देखील Adhar Validation चे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत त्वरीत पूर्ण करून घ्यावे.

सोबत : Adhar Validation Report

(सरोज जगताप)

सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत माहिती व कार्यवाहीस्तव सविनय सादरः

१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.

२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई - ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३ ६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४

ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in

संकेतस्थळ - https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon