SSC Concessional marks to students
Circular pdf copy link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.न.८३२ ए, फा.प्लॉ.नं.१७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे-४११००४
जा.क्र.रा.मं./परीक्षा-७/६४२
पुणे - ४११००४
दिनांक- १३/०२/२०२४
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे
विषय - मार्च २०२४ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या विदयार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/ एस.डी.२ दि.२४/११/२०१७.
२) या कार्यालयाचे जा.क्र.रा.मं./परीक्षा-७/१७४ दि.१५/०१/२४ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुद क्र.०५ नुसार याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळेकडे दि.१५ डिसेंबर अखेर व शाळांनी विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे.
तथापि शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे प्रस्ताव सादर करण्यास संदर्भिय पत्र क्र.२ अन्वये दि. १० फेब्रुवारी, २०२४ अशी मुदतवाढ देण्यात आलेली होती.
सदर मुदतवाढीनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारीत करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नसल्याने मुदतवाढीबाबत विविध' स्तरावरून मागणी होत असल्यामुळे तसेच कोणताही पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये म्हणून शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शुक्रवार, दि. १६ फेब्रुवारी, २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत माध्यमिक शाळांकडून स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरची मुदतवाढ अंतिम असेल यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची दक्षता,
घ्यावी.
(अनुराधा ओक) सचिव,
राज्यमंडळ, पुणे-४.
Also read -
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.न.८३२ ए, फा.प्लॉ.नं.१७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे-४११००४
जा.क्र.रा.मं./परीक्षा-७/१७४
पुणे - ४११००४
दिनांक- १५/०१/२०२४
प्रति,
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे
विषय - मार्च २०२४ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या विदयार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/ एस.डी. २ दि.२४/११/२०१७
२. कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. डिओओ/२०२३- २४/चार/२९३८ दि.२८/१२/२०२३ रोजी चे पत्र.
तथापि संदर्भ क्र.२ नुसार कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ चा निकाल जानेवारी २०२४ अखेरपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव स्विकारण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याबाबत विनंती केली आहे. सदर प्रस्तावास अनुसरून प्रस्ताव स्विकारण्याच्या दोन्ही तारखांना खालीलप्रमाणे मुदतवाढ या वर्षासाठीच देण्यात येत आहे.
१.विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करणे
२. शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करणे
शासन निर्णयानुसार अंतिम दिनांक
दि.१५ डिसेंबर
दि. १५ जानेवारी
वाढीव मुदतीसह नवीन अंतिम दिनांक
सोमवार, दि.०५ फेब्रुवारी २०२४
सचिव, राज्यमंडळ, पुणे-४.
Regarding giving additional concessional marks to students majoring in classical arts, painting, and participating in folk arts.
M.S.Board of Secondary & Higher Secondary Education Divisional .Board
प्रति,
दिनांक ०९/०१/२०२४
विषय :- सन २०२४ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, क्षेत्रात प्राविण्य मिळवणा-या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या विदयार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत...
संदर्भ :- १. शासन निर्णय क. संकीर्ण २०१६/प्र.क./१९५/१६/एस.डी.-६/दि.२४/११/२०१७.
२. शासन शुध्दीपत्र क. संकिर्ण-२०१६/प्र.क. २०२/एस.डी.-२/दि.२०/१२/२०१७.
३. जा.क.रा.मं./परीक्षा- ७/६७११ दि. १२/१२/२०२२.
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क.०२ पत्रास अनुसरून कळविण्यात येते की, शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती शासनाने संदर्भिय शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
सन २०१९ पासून शास्त्रीय कला, चित्रकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक) क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांनाच माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणाची सवलत देण्यात येणार आहे. तसेच एलिमेटरी व इंटरमिजिएट परीक्षेच्या अनुषंगाने संबधित विदयार्थ्यार्थ्यांच्या निकालाची यादी प्रमाणीत करुन पात्र विदयार्थ्यांना संबधित मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख यांनी प्राप्त निकालावरुन सोबत जोडलेले परिशिष्ठ अ व ब प्रमाणित करुन देण्यात यावे. तसेच परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. एखादा विद्यार्थी कीडा, शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य) चित्रकला व लोककलेतील सहभाग यापैकी एकापेक्षा जास्त क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करत असला तरी कोणत्याही एकाच क्षेत्रासाठीचे सवलतीचे गुण जे उच्चतम आहेत तेच घेण्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतो. त्यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सन २०२४ परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर केलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावेत.
संदर्भिय पत्र क.०३ नुसार शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य) चित्रकला लोककला, तसेच खेळाडू एन.सी.सी, स्काउट गाईड इत्यादी प्रस्ताव सादर करतेवेळी राज्य मंडळाचे पत्र क.रा.म./परीक्षा-७/६७११ दिनांक १२/१२/२०२२ च्या पत्रानुसार प्रती विदयार्थी २५/- (रु. पंचवीस फक्त) छाननी शुल्क, बँक चलनाव्दारे किंवा रोखीने भरणा करुन प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील.
उपरोक्त संदर्भातील अ.क.०३ चे पत्र मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी संदर्भीय शासन निर्णयाचे काळजीपुर्वक अवलोकन व्हावे व त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. तसेच निकाल विहित कालावधीत लावणे मंडळास शक्य व्हावे, यासाठी विदयार्थ्यांनी व शाळांनी खालील वेळापत्रकानुसार प्रस्ताव शाळा/विभागीय मंडळाकडे सादर करावीत. खालील कालावधीत व संबधित विदयार्थी/पालक यांच्या निदर्शनास आणून दयावी. जेणे करुन सवलतीच्या गुणापासुन कोणताही विदयार्थी वंचित रहाणार नाही. याची दक्षता घ्यावी. टिप:-
१. मार्च-२०२४ साठी सादर केल्या जाणा-या शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य) चित्रकला लोककलेच्या प्रस्तावासोबत मुळ प्रमाणपत्र न देता संबधित मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्राच्या छायाप्रती सांधाकिंत (प्रमाणीत) करुन दयाव्यात व मुळ प्रमाणपत्रा ऐवजी प्रत्येक प्रकारासाठी (शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला) सोबतचे हमीपत्र दयावे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon