DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshak Shaikshanik Video Nirmiti Spardha Mulyamapan

Shikshak Shaikshanik Video Nirmiti Spardha Mulyamapan

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण तसेच समारंभ

2/4

विषय : शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बा वितरण तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत...

संदर्भ : १. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ४१/एसडी४ दि.११/०५/२०२३.

२. मा. उपसचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्रक्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.४१/एस.डी.४ दि.२४/०९/२०२४

३. प्रस्तुत परिषदेचे पत्र जा. क्र. जि.तालु.नि/०४६७२ दिनांक ३०/०९/२०२४

४. जा. क्र. रा.शै.सं.प्र.प/व्हिनिस्प जि. ता बक्षीस वर्ग/१०७३ दि.२५/०२/२०२५

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. संदर्भ क्र. ०२ अन्वये स्पर्धेच्या निवड यादीस व खर्चास मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त करून आली.

संदर्भ क्र.३ नुसार सदर स्पर्धेचा जिल्हा व तालुकास्तर निकाल घोषित करण्याची प्रक्रिया पार पाडून स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आवश्यक निधी मागणी पत्र प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडून प्राप्त करून घेण्यात आले.

संदर्भ क्र. ४ नुसार शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस रक्कम तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत मंजूर टिप्पणी नुसार निधी वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला. तद्‌नुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तर व तालुकास्तर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्या साठी सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे निधी वितरण केला जात आहे. उपरोक्त नुसार कार्यक्रमात विजेत्यांना रोख रकमेसह ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात यावे. ट्रॉफी व प्रमाणपत्रावर राज्यस्तरीय कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या स्पर्धेच्या स्तरानुसार मजकुरात योग्य तो बदल करून समान मजकूर वापरण्यास हरकत नाही. निधीच्या विनियोगासाठी खालील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

१) सर्व कार्यालयांनी निधीचा विनियोग करतांना आवश्यक वित्तीय नियमांचा तसेच दि.०१/१२/२०१६ च्या

शासननिर्णयातील सूचनांचे खरेदी प्रक्रिया राबवितांना पालन करणे आवश्यक आहे.

२) उपयोगिता प्रमाणपत्र दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत परिषदेस सादर करावे.

३) लेखापरीक्षणाच्या दृष्टीने सर्व लेखे आपल्या स्तरावर जतन करून ठेवावे.

४) ज्या बाबींसाठी निधी वितरीत केला आहे त्याच बाबींसाठी निधीच्या मर्यादेत खर्च करावा.

५) कार्यक्रमाचे उपस्थिती पत्र व निवडक छायाचित्र संकलित करून ठेवावे.

६) जिल्हास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती जिल्हा रु. ५०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.

७) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या ५०% पेक्षाजास्त (म्हणजे २५पेक्षा अधिक बक्षिसे) विजेते असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. १०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.

८) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा जास्त मात्र ५०% पेक्षा कमी विजेते (म्हणजे १३ ते २५ बक्षिसे) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. ५,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.

९) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा कमी विजेते (१३पेक्षा कमी) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधी देण्यात येणार नाही. अशा तालुक्यांनी आपल्या स्तरावर संबंधित विजेत्यांना यथायोग्य सन्मानित करावे.

१०) जिल्हा स्तर विजेते यांना रु. १३०/- तर तालुका स्तर विजेते यांना रु. १००/- सर्वांसाठी समान दर्जाचे प्रमाणपत्र,

परंतु जिल्हास्तर व तालुकास्तर आणि प्रथम, द्वितीय व तृतीय या विजेत्यांना उपलब्ध रकमेत त्या-त्या क्रमांकास

शोभेल अशी ट्रॉफी देण्यात यावी.

यानुसार सर्व कार्यालयांनी उपरोक्त मंजूर कार्यक्रम रकमेचा विचार करून आपल्या जिल्ह्यात बक्षीस वितरणाचे नियोजन करावे. यानुसार बक्षीस संख्या, कार्यक्रम घेण्यासाठी उपलब्ध रक्कम यानुसार जिल्हास्तर स्वतंत्र / जिल्हा स्तर एकत्रित, निधी देण्यात आलेल्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र किंवा जोडून, अश्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे ठिकाण/ठिकाणे, तालुका / जिल्हा, एकत्र / जोडून; बक्षीस वितरण समारंभआयोजित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस देण्यात येत आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून खालील बाबींवर खर्च करता येईल,

१) विजेते व अतिथी यांचेसाठी चहा, नाष्टा / भोजन / वर्किंग लंच

२) कार्यक्रमाचा banner

३) कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट

४) बैठक व स्टेज व्यवस्था

५) आदरातिथ्य

६) कार्यक्रमाच्या दृष्टीने इतर अनुषंगिक खर्च

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी

निधी वितरण तक्ता  पुढे अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून

तरी उपरोक्तनुसार १ ते ३४ क्रमांकावरील जिल्ह्यांचा निधी त्या-त्या जिल्ह्याच्या जि.शि.प्र.सं आणि ३५ वै ३६ क्रमांकावरील (मुंबई DyD व BMC) जिल्ह्यांचा निधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना वर्ग केला जात आहे. त्यानुसार सर्व विजेत्यांना त्यांच्या खात्यात बक्षीस वितरण करणे, जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण समारंभ आयोजित करणे व त्यामध्ये विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून सन्मानित करणेसाठी खर्च रु. ४६४९९७७०/- (अक्षरी रु. चार कोटी चौसष्ठ लक्ष्य नव्याण्णव हजार सातशे सत्तर मात्र) वर्ग करण्यात येत आहे.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करू शकता

राहूल रेखावार (भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Quality Educational Video Production Competition for Teachers 2023 District and Taluka Level Prize Distribution Ceremony

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरण समारंभ


परिपत्रक पुढे अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (सर्व)

निकाल

राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित

शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल

तालुका स्तरावरील निकाल

तालुका स्तरावरील निकाल पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

जिल्हा स्तरावरील निकाल

जिल्हास्तरावरील निकाल पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

  

राज्यस्तरावरील निकाल पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

 

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ - राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी


List pdf Copy Link ⏬

शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा तालुका जिल्हास्तर मूल्यमापन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८

जा.क्र. राशैसंप्रप/आय.टी/शिव्हिनिस्प२३/मुल्यां. मुद/००१९७

दिनांक - ०९/०१/२०२४

E-mail: itdept@maa.ac.in

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,

५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व),

६. शिक्षण निरीक्षक, मुंबई, (पश्चिम/दक्षिण/उत्तर)

७. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)

विषय - शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ तालुकास्तर व जिल्हास्तर मूल्यमापनासाठी मुदतवाढ देणेबाबत....

संदर्भ :-

१. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र. क्र. ४१/एसडी४ दि.११/०५/२०२३.

२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. राशैकसंवप्रपम/आय.टी/शिव्हिनिस्प२३/२०२३/०४८६७

दि.२४/११/२०२३.

३. दिनांक ०८/०१/२०२४ च्या बैठकीतील सूचना.

    उपरोक्त संदर्भ क्र. १ व २ नुसार सुरु असलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ मध्ये भाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्त झाली आहे. याअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यातून एकूण १८,२२० व्हिडीओ प्राप्त झाले आहेत, या व्हिडीओंचे तालुका व जिल्हास्तर मुल्यांकन होणे गरजेचे आहे

    उपरोक्त नुसार प्राप्त व्हिडीओंचे तालुकास्तर मूल्यमापन सुरु असून याबाबत दिनांक ०९/०१/२०२४ पासून तालुकावार प्रत्येक गटातील गटनिहाय / विषयनिहाय प्रथम तीन व्हिडीओ जिल्हा स्तर मूल्यांकनकामी सबमिट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

उपरोक्तानुसारचे पुढील कामकाज पार पाडण्यासाठी खालील कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे:

स्तर

तपशील / प्रमुख

कालावधी

तालुकास्तर निवड प्रक्रिया पूर्ण करून व्हिडीओ जिल्ह्यास पाठविणे

 गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी

१५ जानेवारी २०२४ पर्यंत

जिल्हास्तर निवड प्रक्रिया

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण/प्राचार्य, जिल्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

२० जानेवारी २०२४ पर्यंत (तालुका स्तरावरून जसजसे व्हिडीओ प्राप्त होतील तसे मुल्यांकन सुरु राहील) (अध्यापक विद्यालय व ११-१२वी गट मूल्यमापन जिल्हा स्तरावरून सुरु होईल)

राज्यस्तर निवड प्रक्रिया

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

१५ फेब्रुवारी २०२४ (जिल्हा स्तरावरून जस- जसे व्हिडीओ प्राप्त होतील तसे मुल्यांकन सुरु राहील) 

राज्यस्तर

समितीमार्फत पडताळणीअंती उत्कृष्ट उमेदवारांची शासनास शिफारस

२५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत

राज्यस्तर

पुरस्कार वितरण

१० मार्च २०२४ पर्यंत

करिता उपरोक्त कालावधीत त्या-त्या स्तरावरील मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी.

(श्रीम. ज्योती शिदे)

उप संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

3 comments

Click here for comments
March 3, 2024 at 3:11 PM ×

पुरस्कार प्राप्त यादी जाहीर नाही झाली का ? झाली असेल तर कुठे पाहायला मिळते

Reply
avatar
March 14, 2024 at 10:58 PM ×

आज दिनांक 14 मार्च 2024 पर्यंत तरी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा निकाल लागलेला नाही निकाल लागल्यानंतर ही पोस्ट अपडेट करून या ठिकाणी निकाल घोषित केला जाईल

Reply
avatar
MISSION 2023
admin
June 12, 2024 at 5:16 PM ×

यादी जाहीर झाली का?

Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng