महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११०४५.
ई-मेल: daysdesk4@gmall.com
संकेतस्थळ : https://sports.maharashtra.gov.in
क्र. क्रीयुसे/क्रीगुस/संघटना यादी/२०२४-२५/का-४/४५
दिः ०५.०४.२०२४. 05 APR 2024
प्रति, जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)
महाराष्ट्र राज्य.
विषयः माध्यमिक शालांत (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत (इ. १२वी) प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत....
Regarding giving additional concessional marks to sport students appearing for Certificate Examination in Secondary Schools (10th Class) and Higher Secondary Schools (12th Class)
संदर्भ: १. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/ एस.डी.२, दि.२०/१२/२०१८ व दि. २० डिसेंबर २०१८.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/ एस.डी.२, दि.२०/१२/२०१८ व दि.२५.१.२०१९.
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.
संदर्भीय शासन निर्णयामधील परिशिष्ट १ मध्ये क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळण्याकरीता सुधारीत नियमावली निश्चित केलेली आहे. सदर नियमावली मधील अनुक्रमांक १० अन्वये प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पात्र खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिफारशींसह विभागीय शिक्षण मंडळास सादर करण्यावायत्त निर्देशित केलेले आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी शालेय व इतर क्रीडा स्पर्धेमधील प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन पात्र खेळाडूंचे प्रस्ताव क्रीडागुणांच्या शिफारशीसह विहीत वेळेत संबंधित विभागीय शिक्षण मंडळास सादर करावेत,
संदर्भीय शासन निर्णयातील परिशिष्ठ ११ मधील नमुद ४९ खेळप्रकारांमधील, क्रीडागुणांसाठी पात्र असलेल्या एकविध खेळांच्या राज्य संघटना, राष्ट्रीय एकविध खेळ संघटना/फेडरेशन तसेच त्यांच्या अध्यक्ष व सचिव यांच्या नावांची यादी पत्रासोबत परिशिष्ट-अ मध्ये जोडली आहे.
ज्या एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धामधील सहभागी खेळाडूंचे प्रस्ताव कार्यालयास क्रीडागुण सवलतीसाठी प्राप्त झाले आहेत, त्या संबंधीत खेळांच्या राज्य संघटनांशी संपर्क साधुन संदर्भिय शासन निर्णयामधील परिशिष्ठ ३, ४ व ५ मधील नमूद कागदपत्रे प्रत्यक्ष अथवा इमेल द्वारे सादर करण्याबाबत सूचित करावे.
संदर्भिय शासन निर्णयामधील तरतुदीनुसार, प्राप्त कागदपत्रांच्या छाननीअंती पात्र ठरणाऱ्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद खेळप्रकारांतील खेळाडूंना, क्रीडागुणांची सवलत मिळण्याबाबतची शिफारस विभागीय शिक्षण मंडळास करावी. क्रीडागुण सवलतीसाठी कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावमधील खेळाडूपैकी, पात्र असलेला खेळाडू विद्यार्थी क्रीडा सवलत गुणांपासून वंचित राहिल्यास, संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच इतर संबंधीत कर्मचारी यांच्यावर नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. सहपत्र : एक
(सुधीर मोरे) 5/4/2y
सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य,
प्रत माहितीस्तव सादर.
१. मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २. मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
प्रत माहिती तथा आवश्यक त्या कार्यवाहीसाठी.
१. अध्यक्ष/सचिव, संबधित एकविध खेळांच्या राज्य संघटना.
/- संदर्भीय शासन निर्णयामधील नमुद परीशिष्ठ ३, ४ व ५ मधील नमुद कागदपत्रे सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी
यांना प्रत्यक्ष अथवा इमेल द्वारे पाठवून आपल्या एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित स्पर्धेत सहभागी झालेले पात्र खेळाडू क्रीडागुण सवलतीपासुन वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
मान्यता/सलग्नता.
राज्य संघटना व पदाधिकारी.
परिशिष्ट-अ.
विषयः माध्यमिक शालांत (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत (इ.१२वी) प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत... सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील क्रीडागुण सवलतीकरीता पात्र एकविध खेळांच्या राज्य संघटनांची यादी.
राष्ट्रीय संघटना व पदाधिकारी.
आंतरराष्ट्रीय संघटना
खेळप्रकार
हेही वाचाल
महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११०४५.
संकेतस्थळ : https://sports.maharashtra.gov.in
ई-मेल: dsysdesk4@gmail.com
क्र.क्रीगुस/क्रीगुस/स्पर्धाअभिलेख/२३-२४/का-४/५४०६
दिनांक : १२ फेब्रुवारी २०२४.
13 FEB 2024
प्रति, अध्यक्ष/सचिव, एकविध खेळ राज्य संघटना, महाराष्ट्र राज्य.
विषयः माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत...
संदर्भ: १. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि २०१५/प्र.क्र.२६२/ एस.डी.२, दि.२० डिसेंबर, २०१८.
२. शासन शुद्धीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. उमाशि-एस.डी.२, दि.२५ जानेवारी, २०१९.
संदर्भिय क्र. १ व २ अन्वये, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. संदर्भीय शासन निर्णय क्र.१ मधील परिशिष्ठ -५ अन्वये एकविध खेळांच्या राज्य संघटनेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना सादर करावयाच्या स्पर्धाविषयक कागदपत्रांची यादी नमुद केली आहे. त्यानुसार संबंधित खेळ संघटनांनी विविध स्तरावर पार पडलेल्या स्पर्धांचे रेकॉर्ड तथा अभिलेख क्रीडा व युवक सेवा संचालनालयाबरोबरच राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.
तथापी बऱ्याच एकविध खेळ राज्य संघटनाद्वारा संबंधित स्पर्धाचे रेकॉर्ड फक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर केले जात नसल्याने संबंधित खेळातील खेळाडूंचे प्रस्ताव प्राप्त होऊनही त्यांना क्रीडागुणांची शिफारस करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक खेळाडू क्रीडागुण सवलतीस पात्र असुनही त्यापासुन वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत असून सदरची बाब ही क्रीडाविकासास मारक ठरणारी आहे.
संदर्भीय शासन निर्णयामधील यादीमधील नमुद ४७ खेळप्रकारांच्या एकविध खेळ राज्य संघटनांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धाविषयक खालील नमुद अभिलेखे क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच राज्यातील ३६ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.
१. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचे आयोजनाचे परिपत्रक.
२. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाच्या भाग्यपत्रीका. (Copy Of Draw)
३. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचे अंतिम निकालपत्र.
४. ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धाचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे, त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या नावाच्या प्राविण्यासहीत परिशिष्ठ-१० मधील नमुन्यातील याद्यांच्या २ प्रति. सदर कागदपत्रांवर राज्य संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांच्या शाईची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे यांना खेळाडूंच्या नावाच्या याद्या सादर करताना मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या तीनही जिल्ह्याच्या एकत्रितपणे सादर करणे आवश्यक आहे.
५. एकविध खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या शाईच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र.
वरीलप्रमाणे नमुद स्पर्धाविषयक रेकॉर्ड तथा अभिलेखे क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय तसेच सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना दि.५ एप्रिल २०२४ पुर्वी उपलब्ध करुन द्यावेत. अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्याने पात्र खेळाडू विद्यार्थी क्रीडागुणांपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी.
(सुधीर मोरे)
सहसंचालक
क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य.
प्रत माहितीस्तव सादर.
१. मा. अपर मुख्य सचिव, वित्त व क्रीडा विभाग (अ.का.), मंत्रालय, मुंबई.
२. मा. अध्यक्ष/सचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन.
3. जिल्हा क्रीडा अधिकारी
The government has decided to give additional concessional marks to sportspersons appearing for Secondary School Certificate (E.10th) and Higher Secondary School Certificate (E.12th) examinations.
Government's decision to give additional concessional marks to sportspersons appearing in the examination
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon