DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pariksha Pe Charcha 2024 Sala Spardha


Pariksha Pe Charcha 2024 Sala madhye Spardha Aayojan Circular 

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे-४११००१

ई-मेल :- depmah2@gmail.com
दूरध्वनी क्रमांक - (०२०) २६१२४५७२
दिनांक- ०१/०१/२०२४
क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण/ ००४७/२०२४

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम मुंबई)
४. प्रशासन अधिकारी सर्व मनपा

विषय:- 'परीक्षा पे चर्चा २०२४' अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत

संदर्भ :- 
१) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, New Delhi यांचे पत्र क्र. D.O.No.6-10/2023-PMP-5,dt 29/12/2023
२) अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे ०४ तथा समन्वयक अधिकारी, PPC यांचे पत्र जा.क्र. रा.मं./परीक्षा-२/१५, दिनांक -०१/०१/२०२४

सोबतच्या संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.

    उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत 'परीक्षा पे चर्चा २०२४' हा कार्यक्रम अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केला जाणार आहे. यासाठी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार शाळा स्तरावर दिनांक-१२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. यामध्ये दिनांक १२/०१/२०२४ हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करावयचा आहे. तसेच दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेचा विषय मा. प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षेचा ताण कमी करण्याकरीता दिलेल्या कानमंत्रावर आधारित असेल याबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कालावधीत स्पर्धा/कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचे सेल्फी काढून पत्रात नमूद केलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावयाचे आहेत.

आयोजन करावयाच्या स्पर्धांची यादी व हॅशटॅग खालीलप्रमाणे -

१. मॅरथॉन रन (hashtagjokhelewokhile PPC24)
२. संगीत स्पर्धा (hashtagchaloschoolchale PPC2024)
३. नक्कल स्पर्धा (hashtagmiletosuceedPPC2024)
४. पथनाट्य (hashtagexamwarrior PPC2024)
५. छोट्या छोट्या व्हिडीओवर चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेली प्रतिक्रिया      (hashtagletstalkPPC2024)
६. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांची मुलाखत घेणे. (hashtagbeyourownanchorPPC2024)
७. एखादी संकल्पना घेऊन त्याबाबत पोस्टर तयार करणे. (hashtagkahokahaniPPC2024)
८. योगा-ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन करणे. (hashtagyogaisenergyPPC2024)
९. शाळा संमेलनामध्ये (assembly मध्ये) सुविचार, बोधप्रद गोष्टी, विशेष कार्यक्रम, बातम्यांचे वाचन इत्यादी बाबींचे आयोजन करणे, (hashtagletstalkPPC2024)
१०. स्फुर्तीदायक गीतांचे / राष्ट्रीयगीतांचे (CBSC, KVS, NVS येथील assembly मधील गीतांप्रमाणे)

    तसेच संदर्भ क्र. १ च्या पत्रामध्ये सदर बाबत करावयाच्या कार्यवाहीचे निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचे छायाचित्रण उपरोक्त दिलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावे. तसेच स्थानिक वर्तमानपत्र च प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिद्ध करावे.

    प्रत्येक शाळेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रीय स्वातंत्र्य सैनिकांचे पुस्तक देऊन सन्मानित करावे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र व परीक्षेला सामोरे जातांना करावयाच्या कार्यवाहीचे पुस्तक (Exam warrior book) द्यावे.

    तरी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने व त्यामध्ये दिलेल्या सूचनानुसार केंद्रीय विद्यालय संगठन यांच्या सहभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक १२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचित करावे. अशा प्रकारे दिनांक १२ जानेवारी, २०२४ रोजी राष्ट्रीय युवा दिन यशस्वीरित्या साजरा करणेसाठी उपरोक्त स्पर्धाचे आयोजन करून व दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करून साजरा करावा. तसेच केलेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.

सोवतः- वरीलपणे

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत माहितीसाठी सविनय सादर -
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
(संपत सूर्यवंशी) शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत - अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे ०४ तथा समन्वयक अधिकारी, PPC यांना माहितीस्तव.

👇👇👇👇👇




महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, 
पुणे-४११०३०.
दि. २५/०१/२०२४
जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन / PPC / प्रक्षेपण सुविधा /२०२३-२४/ 569 

अत्यंत महत्त्वाचे / काल मर्यादित

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य / योजना, (सर्व) 4 शिक्षण निरीक्षक मुंबई (सर्व) शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी म.न.पा /नप/नपा (सर्व)

विषय : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे सर्व शाळांमधून थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देणे व सेल्फी स्थळ (selfy point) तयार करणे बाबत

संदर्भ : १) मा. सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचे इ मेल द्वारे प्राप्त पत्र क्र. DO. No. ६-१०/२०२३- PMP-५Part (४) दिनांक १९/०१/२०२४

२) मा. सहसचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांचे इ मेल द्वारे प्राप्त पत्र क्र. DO. No. ६- १०/२०२३- PMP-५ Part (४) दिनांक १९/०१/२०२४ व २०/०१/२०२४

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, मा. पंतप्रधान हे परीक्षा पे चर्चा २०२४ या कार्यक्रमांतर्गत

देशातील सर्व शाळांमधील इयत्ता सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी दि २९ जानेवारी २०२४ रोजी स. ११.०० वा भारत
मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे संवाद साधणार आहेत सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, आकाशवाणी, फेसबुक, यु-

ट्यूब, दीक्षा, स्वयंप्रभा इ स्वरूपाच्या विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होणार आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ आपल्या अधिनस्तजास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी आपल्या स्तरावरून सोबतच्या संदर्भीय पत्राप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच संदर्भ पत्र क्र.

(२) अन्वये महाराष्ट्रात नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नागपूर या शहरांमध्ये सार्वजनिक स्थळी (बस स्थानक, विमानतळ, रेल्वे/ मेट्रो स्टेशन, पोस्ट ऑफिस इ. स्थळी सेल्फी स्थळ तयार करावे व त्याद्वारे विद्यार्थ्यांनी त्या
ठिकाणी सेल्फी घेऊन तो QR कोड द्वारे Mygov या पोर्टल वर अपलोड करण्याबाबत सर्व शाळांना सूचित करावे. तसेच या
कार्यक्रमाची प्रसिद्धी व प्रचार व्हावा यासाठी खाली दिलेल्या लिंकवर विविध भाषातील व्हिडिओ प्रसार माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावे. सदर उपक्रमाची योग्य कार्यवाहीच्या फोटोसह अनुपालन अहवाल या कार्यालयाच्या
मूल्यमापन विभागाच्या evaluationdept@maa.ac.in या इमेल पाठवावा.

https://drive.google.com/drive/folders/towYAoVbxzmQownQTrlKuVHiiv9ol/YUk?usp=sharing


सोबत - संदर्भीय पत्र

अमोल येडगे (गा प्र से)

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

: मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती इमारत, पुणे
मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा. शि.प मुंबई

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng