Divyang Free Mobile Shop On eVehicle application Link
Mobile Shop On eVehicle For Divyangjan Apply Online
दिव्यांग बांधवांना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान
- आवश्यक कागदपत्रे -
• आधार कार्ड • पॅन कार्ड • बँक पासबुक • पासपोर्ट फोटो • मोबाईल नंबर •ई मेल आयडी • डोमासाइल सर्टिफिकेट • रेशन / मतदान कार्ड • दिव्यांग प्रमाणपत्र • UDID कार्ड • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के
ऑनलाईन अर्जदार नोंदणीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्यासाटी / लिंकला जोडले जाण्यासठी या ओळीला स्पर्श करा
दि.22.01.2025 पासून ते दि.06.02.2025 सायं. 6.00 वाजे पर्यंत.
Self-Employment To Divyangjan Through Various Businesses on Environmentally Friendly E-Vehicles / E-Cart
Mobile shop on vehicle for Divyangjan
Registration Link
disabled persons
Regarding provision of a mobile shop on vehicles (mobile shop on vehicle) running on green energy to enable the disabled to become self-reliant.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करुन देणेबाबत... (शुध्दीपत्रक.)
महाराष्ट्र शासन
दिव्यांग कल्याण विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: दिविम २०२३/प्र.क्र.०९/दिव्यांग कल्याण ३ मुंबई
दिनांक :- २७ सप्टेंबर, २०२३
वाचाः १. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. अपंग २०१८/प्र.क्र.१२६/अ.क.२. दि.१०.०६.२०१९.
२. शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक दिव्यांग-२०१९/प्र.क्र.१०४/अ.क्र.२. दि.१.१२.२०१६.
३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचे पत्र क्र. दिविविम/प्र.क्र.१०१७/२०२३/४२४, दि.२३.०३.२०२३.
प्रस्तावना:-
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संदर्भक्र. १ वरील दिनांक १०.६.२०१९ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी रुपये ३.७५ लाख कमाल अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्याग लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी परि. ४ नुसार निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये व्यवस्थापक, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर यांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तथापि, सदर कार्यालय दिनांक २७.८.२०१८ पासून बंद करण्यात आले असल्याने समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. समितीच्या रचनेमध्ये बदल करणे तसेच लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अटी शर्तीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शुध्दीपत्रक
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करुन देण्याबाबतच्या संदर्भाधीन क्र.१ वरील शासन निर्णयामधील परि. ४ मध्ये विभागीय व्यवस्थापक, अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई विभागीय कार्यालय, नागपूर - सदस्य ऐवजी-
लेखाधिकारी, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई सदस्य असे वाचावे.
दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर हे बंद झालेले असल्याने पात्र अर्ज थेट जिल्हा व्यवस्थापकामार्फत दिव्यांग महामंडळाच्या मुख्यालयात सादर करावेत.
परि. ६ योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये अनु. क्र. ९ नंतर
१०. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा,
११. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
या अटींचा समावेश करण्यात येत आहे.
२. शासन परिपत्रक दिनांक ४.७.२०१९ नुसार "अपंग" या शब्दाऐवजी "दिव्यांग" या शब्दाचा वापर करण्यात आला असल्याने अपंग महामंडळाचे नाव आता दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई असे वाचावे, व त्या अनुषंगाने आवश्यक सुधारणा कराव्यात.
३. फिरत्या वाहनांवरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) योजनेच्या अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण विभाग, नगर विकास विभाग आणि ग्राम विकास विभागाकडून दिव्यांग लाभार्थ्यांना निवडलेल्या व्यवसायासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९२७१५५९४०१२३५ असा आहे. हे शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(अधिकराव बा. बुधे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
CAUTION / सूचना
महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना ही रिक्षावाकत योजनेअंतर्गत विभागनिहाय सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांच्या याद्या खाली लिंक वरून पाहता येतील त्यासाठी खालील दिलेल्या लिंकला स्पर्श करून आपला प्रथम विभाग निवडा त्यानंतर आपला जिल्हा निवडा
SEE BENEFICIARIES LIST
सर्व जिल्हा लिस्ट दिव्यांग ई रिक्षावाटप योजना
👆👆👆👆👆
अद्यापही काही अर्जदारांचा फॉर्म भरावयाचा शिल्लक आहे. तथापि फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मिळविण्यासाठी अर्जदार यांना पुरेसा कालावधी मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता अर्जदार नावनोंदणी करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.
याबाबतचे पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी
⭕ नम्र निवेदन⭕
Next Update
FOLLOW WEBSITE
▶️ SUBSCRIBE
For Google News -
🥏 Join Our Social Media Group
©️®️
2 comments
Click here for commentsMy name is Sarosh Sk Aasif am live in muktaingar.
ReplyEquation is best in life and equation is collect easy.
ReplyPlease do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon