DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sarvjanik Suttya Public Holidays 2024

 Sarvjanik Suttya Public Holidays 2024


दिवाळी सुट्टी जाहीर २०२४
या तारखेपासून या तारखेपर्यंत असणार दिवाळीच्या सुट्ट्या 


Also Read 👇 

RNI No. MAHBIL/2009/31745

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन 
राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक ४६ (२)]

शुक्रवार, सप्टेंबर १३, २०२४/भाद्रपद २२, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ९५

प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, 

दिनांक १३ सप्टेंबर, २०२४.

अधिसूचना

क्रमांक सार्वसु-११२४/प्र.क्र.१०६/२०२४/जपुक (२९). - शासनाने सन २०२४ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना, क्र.सार्वसु. ११२३/प्र. क्र.१४८/कार्या-२९, दि.०९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.

२. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.

३. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिपक ब. मोरे,

शासनाचे उप सचिव.

(१)
भाग एक (म.उ.वि.)-९५-१

Circular pdf Copy Link 

Also Read 👇 



महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप-विभाग
वर्ष ९, अंक ७७]
शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०२३/कार्तिक १९, शके १९४५
असाधारण क्रमांक ११८
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ नोव्हेंबर २०२३..
अधिसूचना
सार्वजनिक सुट्ट्या, २०२४
क्रमांकः- सार्वसु-११२३/प्र.क्र.१४८/जपुक (कार्या- २९ ). - परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-
(अ) सार्वजनिक सुट्ट्या

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, 

Mumbai 400 032,

Dated the 9th November, 2023.

NOTIFICATION

PUBLIC HOLIDAYS-2024

No.PHD-1123/C.R.148/JPK (Desk-29).- In exercise of the powers of Central Government under section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 (XXVI of 1881) entrusted to it by the Government of India, Ministry of Home Affairs vide its Notification No.39/1/68/JUDI-III, dated the 8th May, 1968, the Government of Maharashtra hereby declares the following days as Public Holidays in the State of Maharashtra during the calendar year 2024:-

(A) Public Holidays :-

 Sarvjanik Suttya Public Holidays 2024

संपूर्ण राजपत्र वाचण्यासाठी या होळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon