NMMS AND DIVYANG SCHOLARSHIP BIOMATRIC COMPALSARY
Directorate of Education, (Scheme)
शिक्षण संचालनालय (योजना),
पुणे
जा.क्र. शिसंयो/एन.एम.एम.एस/२०२४-२५/यो-२/०१९३१
दिनांक: ०५/०९/२०२४
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद सर्व
२. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख/मनपा/नपा/नप सर्व
विषय : NSP 2.0 पोर्टलवरील एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत.
संदर्भ :
१. केंद्रशासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देश.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक ३०/०६/२०२४ रोजीचा ई-मेल.
३. संचालनालयाने वेळोवेळी व्हि. सी द्वारे दिलेल्या सूचना.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी NSP 2.0 पोर्टलवर एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यर्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे दिनांक ३०/०६/२०२४ पासून सुरु झाले असून एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३०/०९/२०२४ आहे. एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज शाळा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक १५/१०/२०२४, जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक ३१/१०/२०२४.
एन.एम.एम.एस मध्ये सन २०२३-२४ मध्ये परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्याथ्यांची (इयत्ता ९वी) नवीन मधून अर्ज आधार नुसार भरणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १०वी, ११वी व १२वी मधील विद्यार्थ्यांनी नुतनीकरण मधून भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मध्ये ११,६८२ विद्यार्थी पात्र आहेत तर नुतनीकरण मध्ये २८,८६८ विद्यार्थी पात्र आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीमधील नुतनीकरण मध्ये ५२४ विद्यार्थी पात्र आहेत.
NMMS मधील नवीन अर्ज सादर करणाऱ्या विद्याथ्यांची माहिती आधारनुसार नसल्यास तसेच ज्या विद्याथ्यांनी शाळा
बदलली आहे व चालु वर्षी १०वी व १२वी मध्ये शिक्षण घेत आहे, तसेच नुतनीकरण मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज डिफेक्ट
झाल्यामुळे शाळेच्या नावामध्ये बदल करता येत नाही अशा विद्याथ्यांची माहिती विहीत नमुन्यात विहीत कालावधीत दुरुस्तीसाठी पाठविण्यात यावी. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विहित मुदतीपूर्वी शाळा व जिल्हा
स्तरावरुन नवीन व नुतनीकरण अजर्जाची पडताळणी करण्यात यावी. डिफेक्ट केलेले अर्ज आवश्यक ती दुरुस्ती करुन मुदतीपूर्वी ऑनलाईन भरुन पडताळणी पूर्ण करण्यात यावी. दिनांक ०५/०९/२०२४ रोजीची नवीन व नुतनीकरणाची सद्यस्थिती सोबत जोडण्यात आलेली आहे. (परिशिष्ट १ ते ४)
नवीन व नुतनीकरणामधील विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या शाळांमध्ये आपल्या जिल्ह्याद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणे करुन नवीन व नुतनीकरणमधील विद्यार्थी NSP 2.0 पोर्टलवर स्वतःची नोंदणी करतील. विहीत कालावधीमध्ये नवीन व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे व पडताळणी करणे याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधित गटशिक्षणाधिकारी / शाळा यांना सूचना देण्यात याव्यात व Timeline चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे- ४११ ००१.
दूरध्वनीक्रमांक : ०२० / २६१२६७२६ / २६१२३५१५ E-mail Id:- directorscheme.mh@gmail.com
जा.क्र. शिसयो/एनएसपी/ प्रसिद्धी / २०२३-२४/योजना-४०३ / २३८९
दिनांक : १७/११/२०२३
प्रसिद्धी पत्रक
एन.एम.एम.एस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य
केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात येणारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती करीता बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असून राज्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ अखेर एन.एम.एम.एस साठी मागील परीक्षेत शिष्यवृत्तीधारक घोषित झालेल्या ११,६८२ पैकी ६,३३५ नवीन अर्ज तर नूतनीकरणाचे ३५,०४१ पैकी १६,०५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दिव्यांग मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे २४२ नवीन व नूतनीकरणाचे २३६ पैकी ६६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेचे शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ) यांचे या शिष्यवृत्ती योजनांकरीता चालू वर्षी पहिल्यांदाच बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. बनावट अर्जाना प्रतिबंध करणेसाठी तसेच यंत्रणेतील जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्याकडून अर्जाची पडताळणी होण्यासाठी हा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बायो- मॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
बायो-मॅट्रिक प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी आधार ही महत्वाची बाब असून प्रमाणीकरण झाल्यानंतर आधार मध्ये संबंधितांनी दुरुस्ती करू नये. आधार मध्ये दुरुस्ती करून घ्यायची असल्यास ती या प्रक्रीयेपूर्वी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
दोन्ही शिष्यवृत्ती करीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ०२ आठवड्यांचा अवधी असून विहित कालावधीत नवीन व नूतनीकरणाचे अर्ज दाखल करावेत. तसेच शाळास्तरावर दिनांक १५ डिसेंबर २०२३ पर्यत आणि जिल्हास्तरावर दिनांक ३० डिसेंबर २०२३ पर्यंत नोडल अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी कागदपत्रे तपासून करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
शाळांनी एन.एस.पी २० पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दरवर्षी प्रोफाईल अद्यावत करणे आवश्यक आहे. तसेच के. वाय. सी पडताळणी एकदाच करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या शाळेमधूनच ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती करीता विद्यार्थ्यांचे नाव व जन्मतारीख आधार नुसार असणे आवश्यक आहे. एन.एम.एम.एस परीक्षेचा निकाल पत्रकातील नाव व जन्मतारीख यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास इ. ९ वी च्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळांनी शिक्षणाधिकारी यांचे मार्फत योजना संचालनालयास पाठविणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबत दिव्यांगत्वाचा प्रकार हा यु.डी. आय. डी. ओळखपत्र आणि एन. एस. पी २० पोर्टल वरील अर्ज यामधील एकच असावा. शिवाय यु.डी. आय. डी. ओळखपत्रावरील जन्मतारीख व आधारवरील जन्मतारीख एकसारखी असल्यास ऑनलाईन अर्ज करता येईल.
एन.एम.एम.एस व दिव्यांग शिष्यवृत्ती व्यतिरिक्त इतर शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यास लाभ घ्यावयाचा असल्यास विद्यार्थास लॉगीन द्वारे नवीन/ नुतनीकरण (withdraw) करता येईल. मात्र एकदा रद्द झालेला नूतनीकरणाचा अर्ज पुन्हा नव्याने दाखल करता येत नाही. दोन्ही शिष्यवृत्तीच्या नवीन अर्जामध्ये नोंदणी करताना चुकीची माहिती भरली असल्यासविद्यार्थी लॉगीन द्वारे अर्ज रद्द (withdraw) करून पुन्हा नव्याने अर्जची आधार नुसार नोंदणी करावी.
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती धारकास इ. ९वी ते १२वी या चार वर्षात प्रती वर्षी रक्कम रु. १२,०००/- तर दिव्यांग शिष्यवृत्ती धारकास इ. ९वी, १०वी करीता रक्कम रु. ९,०००/- ते १४,६००/- शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्ड ला लिंक असलेल्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. बँक खाते व मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती करिता राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागतो. तर शिक्षण संचालनालय योजना मार्फत शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही केली जाते. यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीधारक घोषित झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातून ७३० केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी १३ हजार ५२३ शाळातील २ लक्ष ६६ हजार २०२ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र पुणे - १
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon