UPI ID BAND KARNYACHA NPCI NIRNAY
मोठी बातमी ! - 31 डिसेंबर 2023 पासून बंद होऊ शकतो तुमचा यूपीआय आयडी - NPCI कडून निर्देश जारी
आजकाल ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी सर्व जण यूपीआयचा वापर करतात. अगदी भाजी घेण्यापासून ते कार घेण्यापर्यंत सगळीकडे आपण यूपीआयने पेमेंट करतो.
मात्र आता लवकरच तुमचा यूपीआय आयडी बंद होऊ शकतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशनने सर्व बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना याबाबत निर्देश दिले आहेत.
पहा कसे आहेत निर्देश
जे यूपीआय आयडी एक वर्षांपासून इनअॅक्टिव्ह आहेत, म्हणजेच ज्या UPI आयडीने एका वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही असे आयडी बंद करण्याचे निर्देश NPCI ने दिले आहेत.
यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देखील देण्यात आली आहे. त्यानंतर असे सर्व आयडी बंद केले जातील. तुमची बँक किंवा थर्ड पार्टी अॅप जसे गुगल पे, फोन पे याबाबत तुम्हाला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज पाठवेल.
यानंतर देखील तुम्ही काहीही अॅक्शन घेतली नाही, तर तुमचा यूपीआय आयडी बंद होईल. यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे.
कित्येक वेळा लोक एखाद्या मोबाईल नंबरवरुन यूपीआय आयडी तयार करतात. यानंतर आपला मोबाईल नंबर बदलताना ते त्या नंबरशी जोडलेला UPI ID बंद करने विसरतात.
दरम्यान जुना नंबर बंद झाल्यानंतर तो UPI ID दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. यामुळे त्याला लिंक असलेला यूपीआय आयडी देखील या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो. यामुळे असे UPI आयडी बंद करण्याचा निर्णय NPCI ने घेतला आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon