DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Jila Parishad shikshak antar jila Badli

Jila Parishad shikshak antar jila Badli

💥 मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद.

🗓️ _नवीन भरती झालेल्यांना 'या' दिवशी नेमणुका तर पुढची नवीन भरती २० मे नंतर होणार_ 

━━━━━━━━━━━━━

🪀 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..! 👇🏻

━━━━━━━━━━━━━

💁🏻‍♂️ ग्रामविकास विभागातर्फे काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येता आले नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती मिळू शकते. पण, आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यात काम करण्यास तयार असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे. 


👩🏻‍🏫 इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गावरील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे. मात्र, एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा स्वजिल्ह्यात जाणार नाही.


🗳️ निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर भरतीला सुरवात

पवित्र पोर्टल शिक्षक भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

👆👆👆👆👆

राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास पाच हजार पदे तर खासगी अनुदानित संस्थांमधील पाच हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया २० मेपासून सुरू होईल. जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याला होकार मिळाल्यानंतर आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे  दरम्यान, मागील भरतीवेळी ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही.

Also Read -

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग

क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था- १४

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०२३

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय :- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत

 संदर्भ :- (१) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४,

दि. ०७/०४/२०२१

दि.२३/०५/२०२३

(२) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, (३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१, (४) शासनपत्र समक्रमांकित दि.२७/१०/२०२३

दि.२१/०६/२०२३

महोदय,

हेही वाचा  

👇👇👇👇👇

आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन दि.२७/१०/२०२३ च्या शासनपत्राचे कृपया अवलोकन करावे. २. सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपआपल्या जिल्ह्यातील बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली यापुर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची कार्यवाही करावी.

आपला,

(पो.द. देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon