सध्या महाराष्ट्र राज्यात
परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणात
पाऊस पडत असल्यामुळे उभी पिके सोंगणी होऊन पडपसर पडलेली पिके मोठ्या प्रमाणात
खराब होत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी
आपला क्लेम खालील दिलेल्या लिंक वर स्पर्श करून अतिशय सोप्या पद्धतीने आपली
तक्रार तुम्ही स्वतः मोबाईलच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई
संदर्भात तक्रार नोंदवू शकता शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा |
पीक
नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत द्यावी |
राज्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा
काढणीपश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत
नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमांक
१८००११८४८५ या क्रमांकाचा वापर करावा. तसेच टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास
या आपत्तीची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक, अथवा कृषी व महसूल विभाग यांना द्यावी सद्यःस्थितीत मागील ४ ते ५
दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरू असून, काही
भागांमध्ये जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असू शकते. |
या पार्श्वभूमीवर पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत
पावसाच्या पाण्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी
अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे
नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर
पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
सद्यःस्थितीत काही पिकांची काढणी सुरू असून, अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या
अधिसूचित पिकांसाठीच कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत (१४ दिवस)
गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे
पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून
नुकसान भरपाई देण्यात येते पंतप्रधान ‘पीकविमा योजना खरीप
२०२३’ या हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित
पिकांसाठी राबविण्यात येत आहे |
शेतकरी बांधवांनी पिक नुकसान संदर्भात आपला क्लेम खालील दिलेल्या लिंक वर स्पर्श करून अतिशय सोप्या पद्धतीने आपली तक्रार तुम्ही स्वतः मोबाईलच्या माध्यमातून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई संदर्भात तक्रार नोंदवू शकता शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा खालील दिलेल्या लिंकवर स्पर्श करून
तक्रार नोंदवू शकता ते ही आगदी सहज |
महाराष्ट्र
शासन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संपूर्ण माहिती असा
मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कोणत्या आजारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळतो कागदपत्रे
कोणती लागतात - मुख्यमंत्री
सहाय्यता निधी संकेत स्थळाला जोडले जाण्यासाठी खालील दिलेल्या
लिंकवर टिचकी मारा |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon