DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

APAAR ID Registry for students

APAAR ID Registry for students 

'Automated Permanent Academic Account Registry (APAAR)

शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना👇





👆या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

केंद्र शासनाने APAAR आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी 


👆हे पोर्टल विकसित केले आहे व १८००-८८९-३५११ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Also Read 👇 

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी

 'ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री' तयार केली जात आहे. याअंतर्गत 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 

याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे हा 12 अंकी आयडी असेल. तसेच पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

 पहा काय सांगितले शिक्षण मंत्रालयाने

'Automated Permanent Academic Account Registry (APAAR)

APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि यशाचा मागोवा घेतला जाईल. 

        शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी APAAR आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रत्येक कौशल्याची माहिती यात फीड केलेली असेल. 

       राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या विषयावर चर्चा करण्यासाठी 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पालक आणि शिक्षकांची बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष टीजी सीतारामन यांनी दिली आहे.

APAAR ID Registry for students 


राष्ट्रीय शिक्षण प्रणाली २०२० मध्ये विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, जे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व पैलूमध्ये विविधता स्विकारणारे नागरिक म्हणून विकसीत होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी सक्षम करेल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेण्याच्या पध्दतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक युनिक आयडी तयार केला जाईल. या युनिक आयडीची विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रगती आणि शैक्षणिक संसाधनाचेही मुल्याकंन करण्यासाठी आजीवन मदत होईल. डिजीलॉकर इको सिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी हा गेटवे असेल जे विद्यार्थ्यांना दोन डिजिटल पध्दतीने त्यांच्या सर्व उपलब्धी उदा. परीक्षेचे निकाल, सर्वागीन अहवाल कार्ड, शिकण्याचे परिणाम तसेच ऑलपियाड क्रिडा कौशल्य, प्रशिक्षण इत्यादी सारखी माहिती प्राप्त करून घेता येईल.

त्यानुसार सर्व शाळामध्ये दिनांक १६ ते १८ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीमध्ये शिक्षक पालक सभा आयोजित करून संदर्भीय पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यात पालकांचे विद्यार्थ्याचे संमत्रीपत्र भरून घेऊन त्यानूसार युडायस + UDISE + प्रणालीमध्ये होय किंवा नाही Yes or No) अशी माहिती भरणे

Creation of Automated Permanent Academic Account RegistryAPAAR ID

APAAR ID Registry for students 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रिडा विभागमंत्रालय (विस्तार)मुंबई

दिनांक:- १२/१०/२०२३

प्रति,

आयुक्त (शिक्षण),

शिक्षण आयुक्तालयमध्यवर्ती इमारत,

महाराष्ट्र राज्यपुणे.

विषय:- विद्यार्थ्यासाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत. 

महोदय,

संदर्भाधीन पत्र आणि सोबतच्या सहपत्राचे कृपया अवलोकन करावे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र Automated Permanent Academic Account Registry (APAAR) ID पालकांच्या पूर्वसंमतीने निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या कार्यवाहीचे वेळापत्रक आणि सूचना संदर्भाधीन पत्राद्वारे उपलब्ध करून दिले आहे. त्यास अनुसरून सदरची कार्यवाही विहित कालावधीत करण्याबाबत आपणांस विनंती करण्यात येत आहे.

सोबत :- वरीलप्रमाणे

कक्ष अधिकारीमहाराष्ट्र शासन

CONSENT FORM

Use of APAAR ID for students, parents and schools

Government of India

Department of School Education & Literacy

CONSENT FORM / Letter Download pdf

CLICK HERE 👇


CLICK HERE 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon