DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Teachers Salary CMP system

 Teachers Salary CMP system 

Salaries of teachers (Teaching) and non Teaching staff in Private aided schools and Zilla Parishad schools through CMP system

महाराष्ट्र शासन 
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय 
अमरावती विभाग अमरावती
मालटेकडी रोड टोपे नगर अमरावती ४४४६०२.
दुरध्वनी क्र. ०७२१-२५५३६०४
ई-मेल - dydamt@gmail.com
जा.क्र.शिउसं/वित्त/अ/ ७२५ / २०२४

दिनांक १९/०१/२०२४

प्रति,
३) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम
४) अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राच/माध्य) अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम

विषय :- अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे माहे जानेवारी २४ पासूनचे वेतन व भत्ते प्रदान सीएमपी प्रणालीव्दारा थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात करण्याबाबत.

संदर्भ :
- १) भारतीय जनता पार्टी, शिक्षक आघाडी-अमरावती विभाग यांचे पत्र क्र/११०/२४ दिनांक १६/०१/२४
२) भारतीय जनता पार्टी, शिक्षक आघाडी-अमरावती विभाग यांचे पत्र क्र/१११/२४ दिनांक १६/०१/२४
३) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः वेतन २७२०/प्र.क्र ९६/टिएनट-३ दिनांक १९ डिसेंबर २०२३
४) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः वेतन १२२१/प्र.क्र ३५/टिएनट-३ दिनांक ०४ जानेवारी २०२४

    उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदभीय शासन निर्णय क्र-०२ सोबत जोडण्यात येत आहे. सदरचे शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपले जिल्हयातील सर्व संबंधित शाळा / कमवि कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी २०२४ पासूनचे वेतन सीएमपी प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्हयात ई कुबेर कार्यरत आहे त्यांनी ई कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचा-यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करावी.
    माहे डिसेंबर २०२३ च्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वेतनाची स्थिती काय आहे, त्याबाबत उलट टपाली अहवाल सादर करावा.

सहपत्रः शासन निर्णय
    ⇓⇓⇓⇓⇓

(डॉ. शिवलिंग पटवे) 
विभागीय शिक्षण उपसंचालक 
अमरावती विभाग अमरावती

हाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार) दालन क्र. ४३९. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई महाराष्ट्रराज्य

दिनांक : २२||२०२३

महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत

    जिल्हा परिषद / महानगरपालिका / नगरपालिका कटक यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रदान सीएमपी (GMP) प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

महागाई भत्त्यानुसार पगार व फरक चेक करा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

याबाबत तांत्रिक बाबी, Testing प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी जालना व चंद्रपूर या जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील व खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे तसेच औरंगाबाद व नागपूर विभागातील महानगरपालिका/ नगरपालिका कटक मंडळ यांचेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहे ऑगस्ट, २०२३ चे वेतन प्रायोगिक तत्वावर सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची कार्यवाही करावी.

अधिकृत पत्राची प्रत pdf Download करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा  👇

 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon