राज्य शासकीय इतर पात्र
कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत |
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः मभवा- १३२३ /
प्र. क्र. ६ / सेवा-९ मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा
राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- ३० जून २०२३ वाचा- १. भारत सरकार, वित्त
मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक:
१/१/२०२३-इ. । (बी), दिनांक ०३ एप्रिल, २०२३ |
शासन निर्णय- राज्य
शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई
भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. २. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक
१ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित
वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३८ % वरुन ४२%
करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२३
ते दिनांक ३१ मे २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे जून, २०२३
च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. ३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान
करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू
राहील. ४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय
कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या
लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या
सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप
लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. |
महाराष्ट्राचे
राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. (वि. अ. धोत्रे ) उप सचिव, महाराष्ट्र
शासन |
राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत
वेतन दिवाळी पूर्वी
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबत आजचा दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय निर्गमित. Teacher Salary GR Circular
परिपत्रक / शासनादेश वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा शासन परिपत्रक
माहे ऑगस्ट २०२२ चे माहे सप्टेंबर २०२२ मध्ये होणारे वेतन / निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे महत्वपूर्ण परिपत्रक / शासनादेश
DOWNLOAD CLICK HERE
हे हि वाचा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon