DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Varishtha Nivadshreni Prashikshan

 Varishtha Nivadshreni Prashikshan

शिक्षणाधिकारी चव्हाण यांना दप्तरदिरंगाई भोवली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ठोठावला दंड, प्रस्ताव ८५ दिवस दडवून ठेवला
सौजन्याने / माहिती स्त्रोत पुढारीवृत्त
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त- सेवा : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांना दप्तरदिरंगाई चांगलीच भोवली आहे. सहशिक्षकाची वरिष्ठ श्रेणी मंजुरीचा प्रस्ताव १५ दिवसांत निकाली काढणे अपेक्षित होते. परंतु चव्हाण यांनी हा प्रस्ताव ८५ दिवस दडवून ठेवला. त्यामुळे शिक्षण सहसंचालक कार्यालयाने चव्हाण यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार आर्थिक दंड ठोठावला आहे.
शहरातील चौधरी शेख मन्नाबी उर्दू प्राथमिक शाळेतील सहशिक्षक शेख रहीम शेख बाबू यांच्या अपिलावर शिक्षण सहसंचालकांनी वरील कारवाई केली आहे.
शेख रहीम बाबू यांनी वरिष्ठ श्रेणी मंजुरीसाठी १४ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावावर ८५ दिवस कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार या प्रस्तावावर पंधरा दिवसांत म्हणजे २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यवाही करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात शिक्षणाधिकारी कार्यालयाने २३ डिसेंबर २०२२ रोजी वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव अमान्य केल्याचे शेख यांना कळविले. त्यानंतर शेख यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कालमर्यादेचा नियम पाळला न गेल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रथम अपील केले. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी २५ जुलै २०२३ रोजी निर्णय पारित केला. त्यात त्यांनी पदनिर्देशित अधिकाऱ्यास केवळ ताकीद दिली. त्यामुळे शेख रहीम यांनी शिक्षण सहसंचालक पुणे यांच्याकडे द्वितीय अपील केले. तिथे सुनावणी झाल्यानंतर शिक्षण सहसंचालक देविदास कुलाळ यांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सदरची सेवा ८५ दिवस इतक्या विलंबाने दिली असल्याकारणाने त्यांना लोकसेवा हक्क अधिनियमातील तरतुदीप्रमाणे प्रतिदिन ३० रुपये प्रमाणे २५५० रुपये एवढा दंड आकारण्याचे आदेश दिले.

सुनावणीसही सातत्याने गैरहजर

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शेख रहीम शेख बाबु यांच्या वरिष्ठ श्रेणी मंजुरी प्रस्तावाबाबत दप्तरदिरंगाई केलीच, परंतु त्यानंतर अपिलीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी आयोजित सुनावणीकडेही पाठ फिरविली. प्रथम अपिलात विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १० फेब्रुवारी २०२३ रोजी या विषयावर सुनावणी ठेवली होती. परंतु शिक्षणाधिकारी चव्हाण या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे २४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा सुनावणी ठेवण्यात आली. त्यावेळी चव्हाण या गैरहजर राहिल्या. तिसऱ्यांदा २४ जुलै २०२३ रोजी सुनावणीची अंतिम संधी देण्यात आली. त्यावेळीही शिक्षणाधिकारी चव्हाण या सुनावणीला हजर राहिल्या नाहीत.

हे ही वाचाल

जनहिताय सर्वदा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४३९, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
Email ID: tnt3.sesd-mh@nic.in
क्रमांक:-वेतन-१२२३/प्र.क्र.१/टिएनटी-३

प्रति,
शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :-
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी बोलवून घेऊन डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होणेबाबत श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांचे दिनांक ३०.१०.२०२३ रोजीचे पत्र

संदर्भ :-
उपरोक्त विषयावरील श्री. श्रीकांत देशपांडे, व श्री. दत्तात्रय सावंत, माजी वि.प.स. यांच्या दिनांक ३०.०८.२०२३ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
०२. राज्यातील ब-याच संस्था/ शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी / नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची विनंती उक्त पत्रान्वये केली आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून आवश्यकतेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात यावा, ही विनंती.

सोबत :- वरीलप्रमाणे
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
दिनांक : ०१.११.२०२३




हे ही वाचाल 

प्रशिक्षण महत्त्वाच्या सूचना ०७ जुलै २०२३
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्वाचे

प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आय. डी व पासवर्ड बाबत...

१. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.

२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.

३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला पासवर्ड वापरावा अथवा पासवर्डच्या खाली दिसणारे Gmail बटन क्लिक करून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.
प्रशिक्षण पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै २०२३ पासून २४ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे
प्रशिक्षण चाचणी व स्वाध्याय बाबत सूचना
वाचा किंवा डाऊनलोड करा

CLICK HERE 👇




वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२३

वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२३ लवकरच सुरू होणार आहे, प्रशिक्षण पासवर्ड नोंदणीकृत ईमेल वर प्राप्त होईल. तेव्हा आपला ईमेल चेक करत राहावे.

वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण Online Mode ने सुरु होत आहे. नोंदणी केलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्वतः चे Login ID वापरून पासून प्रशिक्षणास सुरुवात करावी.

या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारा User Id / Login ID व Password लवकरच प्रशिक्षण नोंदणी  करतेवेळी आपण पुरविलेल्या मेलवर येणार आहेत.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Infosys Springboard App या ॲप व्दारे होणार आहे.

प्रशिक्षण App वर पूर्ण करायचे असल्याने प्रशिक्षण App खालील लिंकवरून इन्स्टॉल करू शकता / खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा

  CLICK HERE 👇



आपण नोंदणीच्या वेळेस पुरविलेल्या ई-मेल आयडीवर आपल्याला लॉगिन आयडी पासवर्ड प्राप्त होणार असल्यामुळे रोज आपला ई-मेल चेक करा लॉगिन प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करावयाची आणि कशा पद्धतीने प्रशिक्षणाला सुरुवात करायची या संबंधी सविस्तर मार्गदर्शन याच ठिकाणी आपणास करण्यात येईल

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत राज्यातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / अध्यापकाचार्य / प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण लवकरच सुरू होत आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यंचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

            वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलश्थ वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदर ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या गाध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. त्या सबंधी आपल्या योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक पुरविण्यात येईल

अधिकृत माहितीसाठी प्रशिक्षण संकेतस्थळ / वेबसाइट ला भेट द्या भेट देण्यासाठी

CLICK HERE 👇

 

पुढील अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत येण्यासाठी आपल्या समाज माध्यामा मध्ये सामील व्हा

सामील होण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा

CLICKHERE

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon