DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

GPF Slip Download

 GPF Slip Download


भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे बंद करुन ते सेवार्थच्या  संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात.

भविष्य निर्वाह निधीचे लेखे सेवार्थ प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यासाठी उपलब्ध सुविधा

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लेख्यांबाबत महालेखापाल कार्यालयाकडून पुरविण्यात येणारी विवरणपत्रे ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक भनिनि -२०१९/प्र.क्र.६१/ का २४, दिनांक ११/०६/२०२० व दिनांक २४/०९/२०२० अन्वये कळविण्यात आलेले आहे.

सदर भविष्य निर्वाह निधीचे लेखे सेवार्थ प्रणालीवरुन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना प्रिंट घेता यावी म्हणून सेवार्थ प्रणालीत सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. (Url: https://sevaarth.mahakosh.gov.in) १) सेवार्थ प्रणालीवरील Employee corner साठी आवश्यक असलेल्या लॉगीनने संबंधित अधिकारी / कर्मचारी (Sevaarth id with Password) लॉगीन करतील. (पासवर्ड रिसेट करावयाचा झाल्यास त्याची सुविधा आहरण संवितरण अधिकाऱ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे).

२) लॉगीन केल्यानंतर उपलब्ध असलेल्या मेनूमधील View GPF Slip या टॅबवर क्लिक करतील त्यानंतर त्यांना पुढील स्क्रीनवर GPF Slip for FY 2022 2023 असे दिसून येईल, त्यानंतर Submit या टॅबवर क्लिक करावे.

३) संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना Authentication करीता Series_Account number_DOB (YYYYMMDD)_Sevaarth id ही माहिती भरावी. सदर भरलेला तपशील जर प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळला तर संबंधितांना GPF Slip Download करता येईल. जर सदर माहिती जुळली नाही तर संबंधितांना संबंधित AG Mumbai Or AG Nagpur यांचेकडे संपर्क करण्याबाबत प्रणालीवर संदेश दिसेल. त्याप्रमाणे संपर्क करण्यात येऊन GPF Slip प्राप्त करुन घ्यावी. तसेच यापूर्वीच्या वित्तीय वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीचे लेखे महालेखाकार मुंबई व नागपूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. याबाबतचे विचारणा करणारे ईमेल कृपया संचालनालयास पाठवू नये.

४) सेवार्थ प्रणालीवर सदर GPF Slip ज्या अधिकारी / कर्मचारी यांचा सेवार्थ आयडी आहे अशा सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामध्ये सेवार्थ प्रणालीवर अटॅच नसलेले कर्मचारी सुध्दा Employee Corner चा वापर करुन GPF Slip Download करता येणार आहे.

५) सेवार्थ प्रणालीवर अटच नसलेले कर्मचारी म्हणजे, ज्या शासकीय कार्यालयात नियमित सेवार्थ प्रणालीशिवाय वेतन अदा होत असलेले कर्मचारी अथवा प्रतिनियुक्तीच्या पदावर पदस्थापना असलेले कर्मचारी तसेच अद्याप कोणत्याही कार्यालयात पदस्थापना प्राप्त नसलेले कर्मचारी आहेत.

६) कर्मचाऱ्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे त्यांना Employee Corner व्दारे GPF Slip Download करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. जर अशा कर्मचाऱ्यांना GPF Slip Download करताना काही अडचणी आल्यास त्यांनी प्रत्येक कोषागारात उपलब्ध असलेल्या तांत्रिक सहाय्यकाच्या ईमेलवर पुढील तपशीलानुसार माहिती देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातील तांत्रिक सहाय्यकाचा ईमेल आयडी सेवार्थ प्रणालीच्या लॉगीन पेजवर Contact Us (Sevaarth Contact details) या टॅबवर उपलब्ध आहेत.

A) कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव

B) सेवार्थ आयडी व पासवर्ड (Employee Corner Login)

C) संबधित महालेखाकार कार्यालय मुंबई / नागपूर

D) भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक (Series_Account number)

E) अचूक जन्मतारीख (1st page of Service book Scan copy )

उपरोक्त तपशीलाव्दारे महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पडताळणी करण्यात येईल व जर अशा कर्मचाऱ्यांची माहिती महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झालेली असेल तरच ती संबंधित कर्मचाऱ्यांला उपलब्ध करण्यात येईल अन्यथा अशा कर्मचाऱ्याला संबंधित महालेखापाल कार्यालयास संपर्क साधण्यास कळविण्यात येईल.


भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे बंद करुन ते सेवार्थच्या  या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात. तसेच या लेखा स्लिपमध्ये काही विसंगती आढळून आल्यास अद्ययावत करण्यासाठी ई-मेलवर कळवावे, असे महालेखाकार कार्यालयाने कळविले आहे.

GPF Slip Download

CLICK HERE 👇


CLICK HERE 👇

अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon