Navodaya Mental Ability Test
नवोदय प्रवेश परिक्षा
नवीन अभ्यासक्रम व बदललेल्या प्रश्नपत्रिका स्वरूपानुसार विषय व प्रश्न संख्या खालीलप्रमाणे आहे.
विषय प्रश्न संख्या गुण
1) मानसिक क्षमता चाचणी 40 50
2) अंकगणित 20 25
3) भाषा 20 25
एकूण 80 प्रश्न 100 गुण
महत्त्वाचे :
1) प्रत्येक प्रश्नास 1.25 गुण आहेत.
2) एकूण 80 प्रश्न असून वेळ 2 तास म्हणजे 120 मिनिटे होय.
3) प्रत्येक प्रश्नास सरासरी दीड मिनिटे वेळ आहे.
4) नियमित सराव केल्यास सर्व प्रश्न सहज सोडवता येतील.
घटक : आकलन
आकलन भाषा ज्ञान
ओळख : या उपघटकातील प्रश्नात समानार्थी/ विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्द अकारविल्हेक्रम, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्हे, वर्णप्रकार, अनुनासिके, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करणे, इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द, इंग्रजी शब्दापासून बनणारे अर्थपूर्ण शब्द इत्यादी विषयक प्रश्न विचारले जातात.
घटक : आकलन
उपघटक : सूचनापालन, वर्णन, मजकूर
आकलन सुचनापालन वर्णन मजकूर
ओळख : या उपघटकातील प्रश्नात अक्षराचे शब्दातील ठराविक स्थान शोधणे, अक्षरे व अंक यांच्या मालिकेत ठराविक गट शोधणे, जोडाक्षरे,स्वरांत अक्षरे/ शब्द, दोन/ तीन/ चार अक्षरी शब्द, जोडाक्षरेयुक्त शब्द यांची संख्या ठरवणे, वर्णमाला आधारित संकल्पना इत्यादी प्रश्न विचारली जातात.
55
Mental Ability Quiz
Please fill the above data!
coin : 0
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon