National Science Drama Festival राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव
विषय: राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव (National Science Drama Festival-NSDF)-२०२४-२५ चे आयोजनाबाबत.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर
क्र.: राविशिर्स/राविनाम/जीव/43०/२०२४
प्रति,
दिनांक :- १५.०७.२०२४
१) शिक्षण उपसंचालक,
.... विभाग
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद
३) शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण)
संदर्भ :-
शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव, नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई यांचे ई-मेल पत्र दिनांक ०९.०७.२०२४
उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्राचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२४ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरु विज्ञान केंद्र, वरळो, मुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करावे. या विज्ञान विषयक नाटयस्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग घेतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार), नेहरु विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ मध्ये विज्ञान नाट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश आहेत.
उपक्रमाचा हेतू :- विज्ञान नाटयोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पध्दतीने देता यावी तसेच विज्ञान नाटयातून विज्ञान लोकप्रिय व्हावे, आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवषी आयोजित केला जातो. उपक्रम आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना-२०२४-२५ या वर्षाकरीता विज्ञान नाटयोत्सवाचा मुख्य विषय व उपविषय पुढीलप्रमाणे आहेत.
मुख्य विषय : Science and Technology for the benefit of mankind. (मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान) हा असून त्या अंतर्गत पुढीलप्रमाणे चार उपविषय दिलेले आहेत.
1) Global Water Crisis -(जागतिक जल संकट)
2) Al and Society
3) Modern Technologies for एआई (AI) आणि समाज) Disaster Management -(आरोग्य आणि स्वच्छता)
4) Health and Hygiene (आपती व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान )
5) Climate Change and its Impact -
( हवामान बदल आणि त्याचे परिणाम )
उपरोक्त विषय व उपविषयानुसार, पश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाट्योत्सव २८ नोव्हेंबर २०२४ रोजी नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन २७ व २८ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान केंद्र, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. याकरीता राज्यातील विज्ञान नाटयोत्सवाचे स्तरनिहाय आयोजन पुढील प्रमाणे करणे आवश्यक आहे.
C
जिल्हास्तरावरील विज्ञान नाट्यस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे राहील व त्यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक/क्षेत्रीय अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्हयात तालुकास्तरावर सुध्दा विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन करुन जास्तीत जास्त विद्याची सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्हयातून विभाग स्तरासाठी एक विज्ञान नाटय चमू निवडण्यात यावा. विभागस्तरावरील विज्ञान नाटयोत्सवाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांचेकडे राहील. त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. विभागस्तरावरुन प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एका विज्ञान नाटय चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल, राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तर्फे करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ या दरम्यान करण्यात येईल. या स्पर्धेची निश्चित तारीख व स्थळ आपणास यथाशीघ्र कळविण्यात येईल.
प्रत्येक जिल्हयातून निवड झालेल्या एक विज्ञान नाटय चमूची माहिती विहित सांख्यिकीय प्रपत्रासह
आपण संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावी व एक प्रत या कार्यालयास पाठवावी.
तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी-
१. कोण भाग घेवू शकतो? शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता ६ वी ते १० वी पर्यतचे)
विद्याथी
२. विज्ञान नाटय पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी कमाल अर्धा तास (३० मिनिटे).
३. भाषा व विषय विज्ञान नाटय हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येईल. विज्ञान नाट्य हे दिलेल्या विषय/उपविषय यावरच आधारित असणे आवश्यक आहे.
४. विज्ञान नाटयाच्या एका चमूत जास्तीत जास्त ८ पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी होवू शकतात. विज्ञान नाटयाच्या एका चमूत विद्यार्थी/विद्याथीनी कमाल संख्या ८ याव्यतिरिक्त मार्गदर्शक शिक्षक, संगीतकार, गायक वादक, नेपथ्यकार, मदतनीस इत्यादींचा समावेश होईल. परंतु प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाट्य सादर करतांना सादरकर्ते विद्यार्थी/विद्यार्थीनी हे जास्तीत जास्त ८ या संख्येत असतील. याव्यतिरिक्त मंचावरील नाटयाच्या दृष्टीने कोणाचाही प्रवेश नियमबाहय समजण्यात येईल. पडदयामागील कलाकारांच्या/मदतनीसांच्या समावेशाबाबत नाट्य चमूचे अधिकार असतील.
५. पंच (Judges) विज्ञान नाटयाचे परिक्षण करतांना ०३ पंच (Judges) असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन, विद्यापीठ किवा संशोधन विभाग यासारख्या शैक्षणिक संस्थामधील विज्ञान तसेच कला, नाटय, संगीत विषयाचे जाणकार (तज्यक) मान्यवर व्यक्तीना शक्यतोवर पंचाचे कार्य सोपवावे. सहभागी शाळेतील शिक्षकांची पंच म्हणून नेमणूक करण्यात येवू नये. या विज्ञान नाट्य स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील,
६. कोणत्याही परिस्थितीत दोन नाटय चमूंना सारखे गुणदान होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्यावी. अशावेळी सारखे गुणदान झाल्यास पनुर्मुल्यांकन करुन पंचांनी अंतिम निर्णय घ्यावा, पंचांचा निर्णय
सर्वांकरिता मान्य व बंधनकारक राहील.
७. विज्ञान नाटय मूल्यमापनाचे निकष एकूण गुण १००
अ) Presentation of the science drama (नाटयाचे सादरीकरण) ५० गुण
ब) Scientific content in the drama (नाटयातील वैज्ञानिक माहिती) ३० गुण
क) Effectiveness of the drama (विज्ञान नाटवाची परिणामकारकता) २० गुण
८. विज्ञान नाटयाच्या दर्जेदार सादरीकरणाकरिता पोष्टर्स, बैनर्स, दृकश्रवण माध्यम, पार्श्वभूमी (Backdrops)
इत्यादीचा वापर नाटय चमूने (स्वतः) करणे अपेक्षित आहे.
९. नाटय चमूने नाट्य सादरीकरणापूर्वी नाटयाची पटकथा (Script) परीक्षकांना किमान दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. इंग्रजी किंवा हिंदी ऐवजी इतर भाषेत नाटय असल्यास, त्या नाट्याची अस्सल (Authentic) इंग्रजी किंवा हिंदी भाषांतराची Script नाटय सुरु होण्यापूर्वी परीक्षकांना
ड्यावी लागेल.
१०. विभागस्तरीय नाट्य स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद पुढीलप्रमाणे प्रस्तावित आहे-
१. परीक्षक मानधन (३ परीक्षक x रु. १,०००/-) रु. ३,०००/-
२. बक्षिसे अ) प्रथम रु. ३,०००/-
ब) द्वितोप- रु. २,०००/-
क) तृतीय- रु. १,५००/-
३. सादिलवार खर्च (ध्वनी, प्रकाश, प्रमाणपत्रे छपाई इ.) - रु. ९,०००/-
असा एकूण रुपये १८.५००/- इतका खर्च एका विभागस्तराकरिता मंजूर राहील.
राज्यस्तरीय विज्ञान नाटय स्पर्धा राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमाकांच्या नाटय चमूतील कमाल ०८ (आठ) विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता (निवास व भोजन खर्च वजा करुन) प्रवास खर्च जवळच्या मार्गाने (एसटी किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी) या संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. शिक्षकांचा खर्च, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता शाळेच्या आस्थापनेतून काढावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रवास तिकीट व बँक पासबुकची xerox प्रत सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच उपरोक्त दिशानिर्देशाप्रमाणे स्तरनिहाय विज्ञान नाटय स्पर्धांचे आयोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा एक उपचार म्हणून पार पाडल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या स्पर्धामागील वैज्ञानिक उद्देश पूर्णतः सफल होत नाही. त्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमाकडे जातीने लक्ष घालून तालुकास्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील आयोजन प्रभावीरित्या होईल, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तर स्पर्धेकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हास्तर स्पर्धेकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्य पार पाडतील.
(डॉ. हर्षलता बुराडे )
संचालक
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था)
रविनगर, नागपूर.
Ministry of Culture Govemment of India
Mailon-9th July NSCM-Mumbai
NSCM
नेहरु विज्ञान केन्द्र राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद् की इकाई संस्कृति मंत्रालय, भारत सरकार
Scorce Centre
(A unit of National Council of Science Museums) Ministry of Culture, Government of India
NSCM-17027/22/2024/332 No.
09th July, 2024
From: The Director
To Regional Academic Authority State Institute of Science Education
Ravinagar, Nagpur Maharashtra-440 001
Sub: National Science Drama Festival (NSDF)-2024-
Sir/Madam,
Nehru Science Centre Mumbai (NSCM), is a constituent unit of the National Council of Science Museums (NCSM), under the aegis of Ministry of Culture, Government of India. Throughout the year, the Centre diligently organizes engaging educational extension activities with the primary objective of popularizing science and technology in both urban and rural areas, benefiting all individuals, particularly students. Among the various programs and competitions administered by the NCSM, National Science Drama Festival stands out as one of the most highly regarded national-level events. The Council firmly believes in the significance of promoting science dramas in an appropriate manner, especially in rural areas, as a means to disseminate scientific literacy and eliminate superstitious beliefs. This traditional mode of communication has proven to be highly effective in cultivating science and technology awareness and fostering a scientific temperament among the masses.
The Science Drama Contests are currently organized at various levels by State/UT co- ordinators across the country, with winners progressing to the Zonal Level. The two best dramas that are the winners of North, South, West, East and North East Zones, are then invited to participate in the National Science Drama Festival. We have witnessed huge participation from almost all States/UT in the last few years, and we believe that your active involvement will contribute significantly to the success of the event.
In order to organise the event in your State, we request you to join us once again as you have so enthusiastically done in past and recommend the best team (1 Winner at State Level) to Zonal Sciences Drama Contest. The Zonal Drama Contest for the West Zone will be held at Nehru Science Centre, Mumbai on 28th November, 2024. The National Science Drama Festival (NSDF) will take place at National Science Centre, Delhi on 27th and 28th December, 2024.
To ensure a seamless collaboration, we request you to organize this event in your State in
collaboration with our Satellite Unit nearest to you. We have enclosed a copy of the rules and
regulations for your reference, which outlines the guidelines for the contest. We kindly request
you to organize the State Level Drama Contest and submit the details of the wifining team in the
enclosed format by 14th October, 2024. Kindly let us know the e-mail address & telephone
numbers of your institute and also name & contact details of the concerned Nodal Officer for
this programme from your office. This will be of great help to us in communicating faster.
Rules and Regulations
National Science Drama Festival (NSDF) is an event where one can experience the extraordinary fusion of science and drama in delivering scientific knowledge to the community. This event celebrates the power of drama to make complex concepts accessible, engaging and captivating audiences of all backgrounds.
NSDF showcases how drama can bring science to life through storytelling, dynamic performances, and creative stagecraft. By incorporating elements of theatre, such as dialogue ånd characterization, science dramas create relatable experiences that connect audiences to scientific ideas on an emotional level. The performances demystify scientific principles while entertaining and educating. They bridge the gap between the scientific community and the public, fostering a greater appreciation and understanding of science.
The Festival is organized by the Council every year. It provides an opportunity to bring the students of different states, languages and cultures to explore theatre as a medium to express and communicate. Hence, we invite the institutions to guide and encourage their students to participate in this refreshing experiment of comprehending and communicating science ideas through this creative art-form.
Who can participate:
The competition is open for school students from 6th to 10th Standard. Two winning teams from each Zone can participate in the NSDF 24-25, which will be held at National Science Centre. Delhi on 27th & 28th December 2024.
Date: 27th & 28th December 2024
Main theme: Science & Technology for the benefit of mankind
Also Read 👇
India International Science Festival (IISF) 2023 अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा
यासंदर्भात, देशभरातील नाविन्यपूर्ण विज्ञान शिक्षक (माध्यमिक शिक्षक) IISF web portal
👆👆👆👆👆
यावर त्यांचे अर्ज दिनांक 03 डिसेंबर 2023 पर्यंत सबमिट करू शकतात.
Also read 👇
राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2023-24 चे आयोजन बाबत मा संचालक,
राज्य विज्ञान व गणित संस्था नागपूर यांचे पत्र
राष्ट्रीय विज्ञान नाट्यत्सोव उत्सव सन २०२३-२०२४ चे आयोजनाबाबत
नाट्यत्सोव राष्ट्रीय विज्ञान नाट्यत्सोव २०२३ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या
दृष्टीने नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व
विषय प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व
व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व
मार्गदर्शक सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करावे या विज्ञान विषयक नाट्य
स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभागी होतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही
करावी उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय संग्रहालय परिषद भारत सरकार नेहरू
विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य
यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२३-२०२४ मध्ये विज्ञान नाट्यत्सोव विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश आहेत.
उपक्रमाचा हेतू
उपक्रम
आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना
मुख्य विषय व उपविषय
तालुका स्तर जिल्हा स्तर व
विभाग स्तर पर स्पर्धेसाठी नियम
भाषा व विषय
पंच
विज्ञान नाट्य
मूल्यमापनाचे निकष
विभाग स्तरीय नाट्य स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद
राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा यासंबंधी संचालक प्रादेशिक विद्या
प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रविनगर नागपूर
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांचे दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ चे पत्र
सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला स्पष्ट करा
NSCM
Nehru Science Center
National Science Drama Festival
Science And Technology
National Science Natyatsov Festival
विज्ञान प्रदर्शनी - प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित
शिक्षण संस्था रविनगर नागपूर 49 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे
अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण 2021 - 22 आयोजित
करणेबाबत परिपत्रक 5 आगस्ट 2022
सविस्तर वाचा किंवा डाऊनलोड करा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon