DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

क्रांतिवीर लहुजी साळवे : प्रश्नमंजुषा Veer Lahuji Salve Vastad

एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक.

    महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजीं  फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणाऱ्या, तसेच लोकमान्य टिळक, म. ज्योतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी साळवे 
    एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीयन क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक.
महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे,परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देणारे लहुजीं.  
म.फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणाऱ्या, तसेच लोकमान्य टिळक, म. ज्योतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी साळवे 

विनम्र अभिवादन !

फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत. लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म.फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (सन १८४८) लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली. वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले. 

 

क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठया गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. लहुजींचे वडील राघोजी पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊतया पदवीने गौरविले होते.
            लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते. फक्त त्या काळात दलितांना लिहिण्या-वाचण्याची बंदी असल्यामुळे लहुजी साळवे फक्त शालेय शिक्षणापासून वंचित राहिले होते.
५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठीअशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही वाकडेवाडीयेथे आहे.
आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारकनिर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.
महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. नवोदित लेखकांनी, साहित्यिकांनी, जागृत समाजाने हे सत्य जाणून घेण्याची गरज आहे की, इतिहास दलित, आदिवासी, विमुक्त, भटके, ओबीसी, बहुजन समाजातील विद्वान, क्रांतिकारक शूरवीर मावळ्यांनीदेखील घडविला आहे.
चंद्रकांत वानखेडे, खुशाल खडसे, दया हिवराळे, पद्मश्री नामदेव ढसाळ, दिगंबर घंटेवाड, प्रा. विठ्ठल भंडारे, अंकुश सिंदगीकर, राजेश खंडारे, नानासाहेब कठाळे, शिवराज दाढेल, प्रा. सुरेश दाभाडे, वि. भ. विटेकर, शंकर तडाखे, वसंत देसाई, प्रा. मा. म. देशमुख, विनोदकुमार बोरकर, प्रा. हरी नरके, प्रा. नरेश करडे, ऍड. एकनाथ आव्हाड आदींसहित त्या सर्व कवी, लेखक, साहित्यिकांचे ज्यांनी आपल्या लेखणीतून, साहित्यातून आद्य क्रांतिपिता लहुजी साळवे तसेच इतर उपेक्षित महापुरुषांचे कार्य समाजासमोर मांडले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना
देवरनावडगामुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.


 


आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon