DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

ORDER-Break the Chain-Modified Guidelines 02.08.2021 महाराष्ट्र शासन यांचे आज दि.०२/०८/२०२१ चे टाळेबंदी (Lockdown) आदेश (Covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये याकरिता)

राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणासंदर्भातील तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने आदेश जारी केले आहेत. 
✓ मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांची निश्चिती करेल.
✓ उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत पुढीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे. 
✓ त्यानुसार सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.
✓ सर्व सार्वजनिक उद्याने व मैदाने आता व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुली करण्यात आली आहेत. 
✓ सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यात येतील. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना दिली आहे. 
✓ सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
✓ जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र, ती शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. 
✓ सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.





BreakTheChain

The health department of Maharashtra has issued orders to maintain third level corona control restrictions in 11 districts of the state - namely Kolhapur, Sangli, Satara, Pune, Ratnagiri, Sindhudurg, Solapur, Ahmednagar, Beed, Raigad and Palghar.
✓ Local Disaster Management Authority will fix restrictions in 3 districts namely Mumbai, Mumbai Suburbs and Thane.
✓ Restrictions in the remaining 22 districts are exempted as follows...
✓ Shops and malls selling all kinds of essentials as well as non-essentials will be open from Monday to Friday from 8 pm and Saturday till 3 pm. All shops and malls will be closed on Sunday except for necessities.
✓ All public parks and grounds will be open for exercise, walking, running, cycling etc.
✓ All government and private offices will be maintained at full capacity. It has been suggested to divide the office hours to avoid travel congestion. Offices that can be run on a work-from-home basis are advised to continue.
✓ All types of agricultural works, construction, transportation of goods, industries will continue at full capacity.
✓ Gym, yoga center, beauty parlor, hairdressing salon Should not use air conditioning and can be operated at 50% capacity from Monday to Friday at 8 pm. However, they will be closed till 3 pm on Saturday and completely on Sunday.

✓ All restaurants with 50% seating capacity will be open till 4 pm. Take away or parcel service can be continued as of now.                    


मा. जिल्हाधिकारी वाशिम यांचे आज दि.०७/०३/२०२० चे टाळेबंदी (Lockdown)  आदेश (Covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये याकरिता)

      Covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ नये याकरिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने वाशीम जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon