युडायस म्हणजे काय ?
U-DISE चा लॉंगफॉर्म Unified District Information System for Education असा आहे.आपण सर्वजण दरवर्षी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती युडायस मध्ये भरून देतो. आणि आपल्या शाळेची माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते त्यामुळे आपल्याला देशातील कोणत्याही शाळेची युडायस मधील माहिती किंवा स्कूल रिपोर्ट कार्ड या वेबसाईटवर मिळू शकतात.
संपूर्ण देशात कोणत्याही शासन मान्यता प्राप्त शाळेला युडायस असतो. मग ती शाळा कोणत्याही प्रकारची, व्यवस्थापनाची, माध्यमाची असो किंवा खाजगी असो, कोणताही युडायस हा अकरा अंकी असतो या अकरा अंकांची माहिती आपण पाहूया.
Udise मधील अकरा अंकांचे पाच भाग पडतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
रंजक माहिती
वरील माहिती वाचल्यावर लक्षात येईल की 01010100101 हा युडायस नंबर आपल्या भारत देशातील कोणत्यातरी शाळेचा असेल, तर हे बरोबर आहे. हा युडायस जम्मू- काश्मीर या राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील चामकोटे तालुक्यातील टीतवाल या केंद्रातील BHSS TEETVWAL या शाळेचा आहे आणि ती देशातील पहिली शाळा आहे असे म्हणू शकतो तर 36104602307 हा युडायस आपल्या देशातील शेवटचा युडायस असून तो तेलंगणा राज्यातील खम्मम या जिल्ह्यातील येरूपेलम तालुक्यातील व केंद्रातील REMIDICHERLA या गावातील MPPS रामपूरम या शाळेचा आहे. तसेच आपल्या राज्याचा विचार करता 27010100101 हा युडायस नंबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्यातरी शाळेचा असू शकतो. तर वरील 27010100101 हा युडायस क्रमांक हा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावातील जि. प. प्राथ.शाळा धानोरा या शाळेचा आहे आणि हा आपल्या राज्यातील पहिला युडायस म्हणू शकतो आणि 27351104501 हा युडायस शेवटच्या शाळेचा क्रमांक म्हणू शकतो.तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिरगाव या गावातील जि प प्राथ. शाळेचा आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 27300100201हा जिल्ह्यातील पहिला युडायस असून तो नगरपरिषद शाळा अक्कलकोट या शाळेचा असून सर्वात शेवटचा युडायस क्रमांक हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील sadepur या गावातील शाळेचा असून तो 27301106501 असा आहे.
जिल्ह्यातील शाळांची डिजिटल माहिती तसेच यु-डायस प्लस मध्ये नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना
दिनांक ३०_०९_२०२० च्या संदर्भीय दिनांक नुसार UDISE + दि ३१_०५_२०२१ पर्यत भरणे बाबत
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon