महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/3602
दिनांक:06 DEC 2024
विषयः "Mega APAAR DIWAS" दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी सर्व शाळांमध्ये साजरा करणेबाबत.
संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. २७/११/२०२४
उपरोक्त संदर्भिय पत्राव्दारे केंद्र शासनाकडून "Mega APAAR DIWAS" दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यासाठी कळविले आहे. या कार्यालयाकडून दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२४ रोजी APAAR DAY राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०६/१२/२०२४ पर्यंत राज्यातील ६०.७५% विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळामध्ये 'APAAR दिवस' साजरा करण्यात यावा.
सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम विस्तृत स्वरुपात राबविण्यात यावी.
जिल्हा, तालुका व मनपा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना द्याव्यात.
दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी मनपा, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा.
जिल्हा, तालुका व मनपा कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्यााबाबत नोंदणी पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
प्रणाली मधील अहवालानुसार ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही सुरुच केलेली नाही, अशा शाळांना जिल्हा, तालुका व मनपा स्तरावरुन तात्काळ सूचना देवून अडचणी असल्यास मुख्याध्यापकांना तालुका कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे व त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.
जिल्हा, तालुका, मनपा व केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी "Mega APAAR DIWAS" साजरा करण्यात यावा.
(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/3488
दिनांक : 26 NOV 2024
विषयः सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी 'APAAR दिवस' साजरा करणेबाबत.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये 'APAAR दिवस' साजरा करण्यात यावा.
सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात यावी.
जिल्हा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना दयावा.
दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रशासनाधिकारी मनपा, गटशिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाहीचा आढावा घ्यावा.
सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे APAAR आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे.
(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
संदर्भ :
१) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. N०.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४.
२) कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४- २५/२८८१ दि. २५/०९/२०२४.
Celebrating APAAR Day Celebration of APAAR Day Making APAAR ID available to all students Celebrating APAAR Divas on 29th and 30th November 2024 In line with making APAAR ID available to all students dt. Regarding the celebration of 'APAAR Divas' on 29th and 30th November, 2024.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon