DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जागतिक मृदा दिन: प्रश्नमंजुषा World Soil Day Quiz


 ५ डिसेंबर-जागतिक मृदा दिनावर आधारित: प्रश्नमंजुषा सोडवा 

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा

५ डिसेंबर-जागतिक मृदा दिन
    ‘आमची माती’ असं हक्काने म्हणता यावे, यासाठी संपूर्ण जगाला पोसण्यासाठी स्वतः आईसमान झिजणाऱ्या मृदेला अबाधित ठेऊन, तिची सुपीकता राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया… शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल! जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने चला तर मग, स्वतःला जपण्यासाठी मृदेलाही जपूया…मातीची महती काय सांगावी, भुकेल्यांची भूक भागविणाऱ्या निस्वार्थ अन्नदात्रीला म्हणजेच मृदेला वाचवूयात !
    यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्तमाती हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
    आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
    माती कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला की खडकांची झीज होऊन माती तयार होते. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू असते . साधारण १ सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. जमिनीतील १० ते १५ सेंमी. मातीची थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने तयार होतो . हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.
    शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
    शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सेंद्रीय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत पुरवठा, पीक फेरपालटीचा अभाव इत्यादीमुळे जमिनींचे गुणधर्म बदलत असून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. जमिनीची सुपीकता खालावत चाललेली असून तिचे आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. 
    प्रदेशनुसार माती मध्ये बदल होतो. मातीचे विविध प्रकार आपण अभ्यासले आहेत. माती म्हणजे व्यक्तीच जीवन अस म्हणणं वैर ठरणार नाही. कारण माणसाची अन्न ही मूलभूत गरज मातीमुळे भागवली जाते. पिकाच्या वाढीसाठी मातीमधील घटकांची आवश्यकता असते.
    जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरत आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन ठेवणे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
    रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

● मातीचे प्रकार व स्थान ●
◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा 
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा 
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा / भाबर मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

_या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी_
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या आपल्या YouTube चानेल्ला Subscribe करा
 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon