DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शारीरिक शिक्षण दिन प्रश्नमंजूषा Physical Education Day Quiz

  ''शारीरिक शिक्षण दिन"  प्रश्नमंजूषा  चे आयोजन सर्व इयत्ता व  सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या  विद्यार्थ्या करिता उपयुक्त 
आज शारीरिक शिक्षण दिन. शारीरिक शिक्षणाचे धडे अगदी बालवयापासून मुलांत रुजविण्यासाठी उन्हातान्हात मुलांबरोबर खेळणाऱ्या , बागडणाऱ्या शारीरिक शिक्षणाच्या निस्सिम पुजाऱ्यांना मनःपूर्वक दंडवत 🙏 आणि तुम्हा सर्वांच्या कुशल मार्गदर्शना खाली तमाम महाराष्ट्रातील सर्व खेळाडू राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवू देत या भरभरून शुभेच्छा 🌹
Subscribe to Next Update -


    आज मुलांचा कल बहुतांशी टीव्ही, संगणक, मोबाइल याकडे वळताना दिसतो. घरी बसून हे सगळे करण्यापेक्षा मैदानात मुले खेळली तर त्यांची शारीरिक, मानसिक वाढ उत्तम होईल हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. तरीही आपण या मुद्यांकडे गंभीरपणे पाहात नाही. जागतिक स्तरावर असे अनेक अहवाल आलेले आहेत, ज्यात मुलांमधील लठ्ठपणा, स्थूलपणा, मधुमेह यांचे प्रमाण वाढत चालल्याचे सांगितले जाते. मग त्यावर उपाय हा केवळ आहार बदलणे हा नसून त्याला शारीरिक व मानसिक व्यायामाची जोड देणे हादेखील आहे. किंबहुना, शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिले गेले तर आपोआपच आहाराच्या सवयी बदलू शकतील. शिवाय, या विषयाला महत्त्व दिले तर शाळाशाळांमधील उपाहारकेंद्रेही मुलांना आरोग्याला पोषक असेच पदार्थ विकतील. अशी सुदृढ पिढीच पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात देशाचे नाव उज्ज्वल करू शकेल. म्हणूनच शारीरिक शिक्षणाला, क्रीडाशिक्षणाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला शारीरिक शिक्षक आणि क्रीडाशिक्षक अशा दोहोंचीही गरज भासेल. 

 

Subscribe to Next Update -

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon