आजादी का अमृतमहोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होऊन दहा हजार ते सहा लक्ष पर्यंतची बक्षिसे जिंकण्याची सूवर्ण संधी...
आजादी का अमृत महोत्सव* निमित्त युवकांना कला गुणांच्या माध्यमातून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, कलेच्या माध्यमातून देशप्रेम अभिव्यक्त करता यावे., देशातील युवकांच्या अंगी असलेल्या कला गुणानां चालना मिळावी, तसेच युवकांच्या प्रतिभेला देशपातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे.... या उदात्त हेतूने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या क्रीडा व युवक मंञालयातर्फे खालील तीन स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
०१ रांगोळी स्पर्धा
०२ चिञकला स्पर्धा
०३ गीत रचना स्पर्धा (लोरी, कविता, श्लोगन)
भाषेची व शब्द मर्यादेची अट नाही.
सहभागी कोण होऊ शकतो
वय वर्षे दहा पुर्ण झालेले सर्व विद्यार्थी....
बक्षिस
राज्यस्तरीय - प्रथम,द्वितीय,तृतीय व
राष्ट्रस्तरीय- प्रथम, द्वितीय, तृतीय
बक्षिस रक्कम
दहा हजार ते सहा लक्ष.
बक्षिस वितरण
मन की बात कार्यक्रमात
बक्षिसाची घोषणा
माहे फेब्रुवारी २०२२ अखेर
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख दि.१५ फेब्रूवारी २०२२
स्पर्धेत सहभागी कसे व्हवे
खालील वेबसाईट ओपन करावे
ही लिंक ओपन करताच
competition Azadi ka Amrit Mahotsv असे दिसेल... त्यावर क्लिक करतातच तीन स्पर्धा एकाखाली एक दिसतील...
रांगोळी, चिञकला, गीत रचना यापैकी आपण ज्या कलेची निर्मिती केली आहे त्यावरील
PARTICIPATE वर क्लिक करावे.
क्लिक करताच BSG. NSS. NCC. NYK OTHER अशा शासनमान्य युवक आर्गेनायझेशनची नावे दिसतील... त्यापैकी आपण ज्यात कार्ये करतो त्या Org. वर क्लिक करावे.
जर Org नसेल तर Other ला क्लिक करावे. क्लिक करताच आपले नाव व मोबाईल नंबर (वाॅटसॅप नंबर) नमुद करुन सेंड करावे. सेंड करताच OTP येईल तो नमुद करावा.
नंतर फाईल निवड करुन आपल्या कलाकृतीचा फोटो अपलोड करावे.
फोटो अपलोड करताना आपल्या कलाकृतीसोबत सेल्फी फोटो घेवुन अपलोड करणे अनिवार्य आहे.
नंतर स्पष्ट दिसेल असा रांगोळी, चिञकला, गीत यांचे फोटो अपलोड करावे.
एका मोबाईल फोन वरुन अनेक सदस्याना सहभाग घेता येतो.
आपण यशस्वीपणे सहभाग नोंदवताच नमुद केलेल्या वाॅटसॅप नंबरवर सहभागी प्रमाणपञाचे pdf मिळेल. ते आपण कलर प्रिंट करुन जतन ठेवावे....
कला व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon