DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shishyavrutti Pariksha 4 7 purv tayari प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026-27 च्या पूर्व तयारीबाबत

Shishyavrutti Pariksha 4 7 purv tayari



PSE UPS EXAM UPDATE INFORMATION 

prathamik shishyavrutti pariksha (Iytta 4 thi) v uccha prathamik shishyavrutti pariksha (Iytta 7 vi) san 2026-27 chya purv tayaribabat


Regarding preliminary preparation for the Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard) for the year 2026-27

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महत्त्वाचे / कालमर्यादित

जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/362.3

दिनांक: 25/08/2026


प्रति,

1. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका,

2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

3. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण पश्चिम उत्तर)

4. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व,

5. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.

     विषय : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026-27 च्या पूर्व तयारीबाबत....

संदर्भ :- 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राडशि/प्र.क्र.23/2025(ई-1142170)/एसडी-5, दि. 17/10/2025.

2. प्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिसेफ-2026/प्र.क्र.39/वित्त-3, दि. 26/06/2026.

उपरोक्त विषय व संदर्भ क्र. 1 नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 बो) सन 2027 च्या परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी 2027 मध्ये करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. 4 थी व इ. 7 वीच्या विद्याथ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे.

संदर्भ क्र. 2 च्या शासन निर्णयानुसार राज्यतील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सदर राखीव ठेवलेल्या 5% निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शाळांतील इ. 4 ची व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्याथ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2027 ची अधिसूचना माहे ऑक्टोबर 2026 मध्ये प्रसिध्द करण्यात येणार असून संदर्भ क्र. 2 नुसार सदर परीक्षेसाठी आपल्या अधिनस्त जिल्हा परिषद / मनपा शाळांचे शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी आवेदनपत्र शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणा करण्याची तरतूद करावी.

तसेच इ. 4 थी व इ. 7 वी 2027 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व शाळांना पूर्वतयारी म्हणून शाळा माहिती प्रपत्रामध्ये शाळेची व विद्यार्थी आवेदनपत्रामध्ये (इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 नुसार) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून संकलित करण्यास आपल्या स्तरावरून कळवावे, सदर माहिती भरलेली प्रपत्र शाळेतच ठेवावी, जेणेकरून सदर परीक्षेची अधिसूचना प्रसिध्द होऊन ऑनलाईन लिक उपलब्ध होताच आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे सुलभ, जलद व बिनचुक होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना उपरोक्तनुसार कार्यवाही करण्यास सूचित करावे.

सोबत :- संदभर्भीय शासन निर्णय


(डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32.

2. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 01.

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी:-

1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, महाराष्ट्र राज्य.

2. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :-

मुख्याध्यापक, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाराष्ट्र राज्य,
prathamik shishyavrutti pariksha (Iytta 4 thi) v uccha prathamik shishyavrutti pariksha (Iytta 7 vi) san 2026-27 chya purv tayaribabat




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon