DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Scholarship Exam Class 4th 7th Update

Scholarship Exam Class 4th 7th Update



Scholarship exam standard 4th and standard 7th update information
Shishyavruti Pariksha Iytta 4 7 Pravesh Aarj

जा.क्र. मरापप/अ.शा/शिष्यवृत्ती/2025/171


दिनांक: 26/11/2025

विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) 2026 प्रविष्ठ शाळांचे संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणेबाबत...

संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.23/2025(ई-1142170)/एस.डी.-5, दि. 17/10/2025.

उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन 1954-55 या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही परीक्षा असून शालेय स्तरावर या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संदर्भीय शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इ. 5 वी ऐवजी इ. 4 थी व इ. 8 वी ऐवजी इ. 7 वी असा करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. 6 व 7 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. त्यानुसार सदर शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात आली असून सदर शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात / गोपनीय अहवालात करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सन 2025-26 या शैक्षणिक सत्रामध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल 2026 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार आपल्या अधिनस्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इ. 4 थी व इ. 7 वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ठ केल्यास तसेच सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद सेस फंड /महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत निधीतून अदा केल्यास सदर विद्यार्थ्यांवर शुल्काचा आर्थिक बोझा न पडता शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होईल.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आकारण्यात येणारे शुल्क खालीलप्रमाणे आहे.

1. बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रु. 200/- प्रती विद्यार्थी

2. मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रु. 125/- प्रती विद्यार्थी

तरी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे इ. 4 थी व इ. 7 वीच्या टप्प्यावर त्रयस्थ संस्थेव्दारे मूल्यमापन करण्याची संधीही या परीक्षेव्दारे उपलब्ध असून त्याव्दारे संपूर्ण राज्यात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपला जिल्हा नेमका कोणत्या स्थानावर आहे ? तसेच गुणवत्तावाढीसाठी भविष्यात कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? याचा आराखडा तयार करता येईल.

यावर्षी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 साठी परीक्षा परिषदेच्या

 https://puppssmsce.in

या संकेतस्थळावर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त प्रविष्ठ शाळांचे शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणा करणार किंवा कसे ? याबाबत कृपया आपले अभिप्राय खालील नमुन्यात परीक्षा परिषदेस दि. 28/11/2025 रोजीपर्यंत
📧 mscescholarship@gmail.com 

या ईमेलवर कळवावे, जेणेकरून प्राप्त माहितीनुसार संकेतस्थळामध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याकरीता सुविधा विनाविलंब सुरू करणे सोईचे होईल.

माहिती पाठविण्यासाठीचा नमुना :-

जिल्हा परिषद

1. जिल्हा परिषद शाळांचे शाळा संलग्नता शुल्क जिल्हा परिषद सेस फंडातून भरणार आहात का ? होय / नाही

2. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद सेस फंडातून भरणार आहात का ? होय / नाही

- महानगरपालिका

1. महानगरपालिका शाळांचे शाळा संलग्नता शुल्क महानगरपालिका सेस फंडातून भरणार आहात का ? होय / नाही

2. महानगरपालिका शाळांमधील विद्याथ्यांचे शुल्क महानगरपालिका सेस फंडातून भरणार आहात का ? होय / नाही

प्रति,

सस्नेह सादर....

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

डॉ. नंदकुमार बेडसे (भा.प्र.से.) अध्यक्ष
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) 2026 प्रविष्ठ शाळांचे संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद सेस फंड / मनपा निधीतून भरणेबाबत



Regarding payment of affiliation fee of schools participating in Primary Scholarship Examination (4th standard) and Upper Primary Scholarship Examination (7th standard) 2026 and examination fee of students from Zilla Parishad Cess Fund / Municipal Corporation Fund


प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)

(शासन निर्णय क्र. प्राउशि/प्र.क्र.२३/२०२५ (ई-११४२१७०) / एसडी-५, दि. १७/१०/२०२५ अन्वये)

परीक्षेचे स्वरुप Format of Exam

Scholarship Exam Class 4th (PSE) And Scholarship Exam Class 7th (UPS)

पेपर क्र.

विषय

प्रश्न संख्या

गुण

वेळ

प्रथम भाषा

२५

५०

०१ तास ३० मिनिटे

 

गणित

५०

१००

एकूण

७५

१५०

तृतीय भाषा

२५

५०

०१ तास ३० मिनिटे

 

बुध्दीमत्ता चाचणी

५०

१००

एकूण

७५

१५०

प्रश्नांची काठीण्य पातळी :-

सोप्या स्वरुपाचे प्रश्न 30%

मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%

कठीण स्वरुपाचे प्रश्न 30%

महत्त्वाचे :- उपरोक्त दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल.


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon