DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत Vidyarthi Patpadtalni

 Vidyarthi Patpadtalni 

Shalanchi Vidyarthi Patpadtalni GR 

दिनांक: 31 MAR 2026

क. शिसमा/ टि-८६/२०२५-२01820129


विषय: राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.


संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांक: लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/ एराएम.३, दिनांक ०३.११.२०२५


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबावत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


१. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी विद्यार्थ्यांची  पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल.

२. शैक्षणिक सत्र २०२५-२६ माय इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी.

३. इयत्ता २ री ते इयत्ता ८वी च्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ११/०४/२०२६  १५/०४/२०२६,२२/०४/२०२, रोजी करण्यात यावी,

४. इयत्ता ९ वी या वर्गाच्या बावतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (११/०४/२०२६, १५/०४/२०२६,२२/०४/२०२६) दिवशीच करणे नियोजित आहे.

५. राज्यातील सर्व शाळामधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. २१ एप्रिल २०२६, ११ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात यावेत. 

६. तसेच इयत्ता ११ वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशाख व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुध्दा अनुक्रमे दि.११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६, रोजी आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांमधील इयता २ री ते ९ वी व ११ वी  पटपडताळणी उपरोक्त तीन दिवशी पुर्ण होईल,

७. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Logn 4 EO Login वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहीती / सूचना आपणास ७ एप्रिल २०२६, रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल.

८. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (IET) पे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. याची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.

९. शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ) यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.

🔳 परिपत्रक पीडीएफ

Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 31-03-2026 13:27:16

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक

प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे


Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR

Date: 30-03-2026 20:25:54

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र शासन


शिलणाधिकारी (प्राथनिक माध्यमिक जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर बृहन्मुंबई)

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक  (सर्व)+

राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon