DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ Sevarth Pranalitil Karmachari e Kyc GR सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत वित्त विभाग परिपत्रक

Sevarth Pranalitil Karmachari e Kyc GR

Sevarth Pranalitil Karmachari e Kyc GR


WhatsApp Channel FollowJoin Now
Telegram GroupJoin Now
WhatsApp GroupJoin Now


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04

शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र शासन (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी

दिनांक :-१८/०८/२०२६

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व

३) शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम, मुंबई

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व.

     विषय :- शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ.

संदर्भ- १. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २७/३/२०२६

२. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २३/४/२०२६

३. मा. प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि.२८/७/२०२६ रोजी आढावा बैठकीत दिलेले निर्देश.

४. संचालनालयाचे पत्र.क्र. क्र. शिसंमा/२०२६/टि-६ बि/ई-केवायसी/, दि.३१.०७.२०२६.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये माहे ऑगस्ट २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

तथापि क्षेत्रियस्तरावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेताला असता, सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात.

Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 19-08-2026 15:54:39

(शरद गोसावी) शिक्षण संचालक, प्राथमिक
महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR Date: 19-08-2026 14:05:19




(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रतः- माहितीस्तव सविनय सादर-

१) मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२) अवर सचिव (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सर्व

प्रत. श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय माहे ऑक्टोबर, २०२६ चे देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये वेतन देयक तयार होणार नाही याबाबत व्हॅलीडेशन देण्यात यावा.

🙋 👇


Regarding completion of e-KYC of officers/employees in the Sevarth Pranali

Sevarth Pranalitil Aadhikari Karmachari Yanche e Kyc Purn Karne

e-KYC In Sevarth Pranali


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04

Regarding completion of e-KYC of officers/employees in the Sevarth Pranali

Regarding completion of e-KYC of officers/employees in the service system

सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत शासन परिपत्रक

दिनांक: २७ मार्च, २०२६

प्रस्तावना -

सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन आहरीत होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा PAN क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे. एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, याकरीता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरुन, सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक :-

१. सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी माहे एप्रिल, २०२६ देय मे, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करावयाची आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी /कर्मचारी यांचे माहे एप्रिल, २०२६ देय माहे मे, २०२६ चे वेतन आहरीत करण्यात येणार नाही.

२. सदर ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी/कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरीत बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकांशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे.

३. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला PAN क्रमांक चूकीचा असल्यास, नोंदविण्यात आलेला PAN क्रमांकाची दुरुस्ती करुन अद्ययावत करण्यात यावा.

४. सदर ई-केवायसी प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी / कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे. सदर नोंद करतांना ई-केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी अन्यथा प्रथम ई-केवायसी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा.

२. तसेच सदरचे परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था, अदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण/कौशल्य विकास विभागाच्या अधिनस्त संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांनादेखील लागू राहील.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६०३२७१४४१५६७००५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


 शासन परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक 


(अशोक चौधरी) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४

दालन क्रमांक ३३९, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon