MH TET Online Apply Link
MH TET Exam 2026 Online Apply Link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2026
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज लिंक
2026 MAHA TET 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ परीक्षेचे रविवार दि. २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे.
इ. १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. २७.०३.२०२६ पासून सुरु होत असून दि. १६.०४.२०२६ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.
अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा कालावधी
१ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६
२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे - दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर । दिनांक व वेळ रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.
(महेश चौथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
स्थळ : पुणे
दिनांक : /०३/२०२६
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 (MAHATET) जाहीर प्रकटन
प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) प्रविष्ठ होणेकरिता शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणेबाबत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ वेळापत्रक
अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा
१ ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६
२ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे - दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६
३ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर । दिनांक व वेळ - रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
४ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 11 दिनांक व वेळ कालावधी - रविवार दि. २१.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षाध्यर्थ्यांनी नोंद घ्यावी.
टिप :
१. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.
२. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इ. बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी.
३. सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा. पेपर । (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
६. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच, आवेदनपत्र / कागदपत्र (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करु न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.
९. शिक्षक पात्रता परीक्षा सन २०१९ व २०१८ या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ अन्वये सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्हयाचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित अशी शास्ती निश्चित करून, या कार्यालयाचे आदेश क्र. मरापप/बापवि/२०२२/३८४४ दि. ०३.०८.२०२२ व आदेश क्र. मरापप/बापवि/२०२२/४८३९ दि. १४.१०.२०२२ अन्वये गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी/उमेदवार यांचे विरूध्द शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सबब सन २०१९ व २०१८ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही. तथापि सन २०१९ व २०१८ गैरप्रकाराच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची परीक्षार्थी/उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in संकेतस्थळ तपासावे.
११. परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे.
माहिती स्त्रोत
हेल्पलाईन नंबर ९०२८४७२६८१/८२/८३
दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ सकाळी १०.०० ते सायं ६.००
सविस्तर माहिती करिता संकेतस्थळ https://mahatet.in
(महेश चौथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
स्थळ : पुणे
दिनांक : /०३/२०२६

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon