DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

अंगणवाडी सेविका Anagawadi



✳ नोकरीनामा ✳

● या आणि आशा प्रकारच्या जाहिरातीसाठी / रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२३ २४ या आर्थिक वर्षासाठी "भाऊबीज भेट" रक्कम मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२३/प्र.क्र.२६८/का.६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक :- १८ ऑक्टोबर, २०२३

वाचा :- १) महिला व बाल विकास विभाग, शा.नि.क्र.एबावि-२०१७/प्र.क्र.१०३/का.६, दि. २३ फेब्रुवारी २०१८ २) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र.एबाविसेयो / अं वाडी- भाऊबीज भेट/२०२३-२४/४७२०, दिनांक १२.९.२०२३

प्रस्तावना:-
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वाचा क्रमांक- २ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट प्रत्येकी रु.२,०००/ प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचा-यांना सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु.२,०००/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देत आहे.
२. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक :- एक्स-१, २२३६, पोषण आहार, (०८) (०६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (भाऊबीज भेट) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (२२३६१९५४), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन २०२३ २४ या वित्तीय वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधुन रुपये ३७.३३०२ कोटी (अक्षरी रुपये सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार फक्त) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
३. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना दिवाळीपुर्वी भाऊबीज भेट अदा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावी. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
अंगणवाडी येथे ३२ हजार सेविका व मदतनीस रिक्त पदे भरली जाणार
Anagawadi In Maharashtra
अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भात महत्त्वाचे
 राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे.
◆ प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे.
◆ अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे.
◆ इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या  बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. 
एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्राकडून पुरस्कार प्राप्त योजनेतून महाराष्ट्र राज्यात अंगणवाड्यात या चालवल्या जातात.त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे. 2020 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले आहे त्यामुळे आता अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घालताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अंगणवाडी येथे ३२  हजार 601 जूनी रिक्त पदे भरली जाणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात यामुळे बदल आले आहेत आणि त्यासोबतच रोजगाराला चांलना मिळाली आहे. त्यामुळे आता अंगणवाडीत सेविकांची भरती सुरू करण्यात आली आहे. या हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत
    अंगणवाड्यातील अनेक जागा रिक्त असतात त्यात भरती होणे आवश्यक असते समोर आलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रातील सर्व भागात असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये आता रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत. अंगणवाड्यांचे महत्त्व हे ग्रामीण भागांमध्ये खूप मोठं आहे. त्यातून महाराष्ट्रातील अनेक भागात आजही अंगणवाडी कमी आहेत. त्यांचे महत्त्व रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महसुली गावात जिथे अंगणवाडी नसतील तिथे नव्या अंगणवाड्याही उघडल्या जातील.
अंगणवाडी सेविकांना मिळणार 'हा' लाभ
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.
अंगणवाडीत कोणत्या पदांची भरती होणार ?
अंगणवाड्यांमध्ये 2017 पासून पदे रिक्त आहेत. तेव्हा पासून एकूण ३२ हजार पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे. अंगणवाडी सेविकांचीही पदभरती यानिमित्तानं केली जाणार आहे. तेव्हा यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या 31 मे पुर्वी 
अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका
यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश एकात्मिक बालविकास आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडून देण्यात आले आहेत. आणि यासाठी सर्व जिल्हा परिषदांना अपडेटही करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता काय असणार ?
आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
अंगणावाडी सेविकांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर कोणतीही पदवी (Graduation), पद्यूत्तर पदवी (Post Graduation), उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल.
31 मे 2023 डेड लाईन असणार
भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण
◆ इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील.
◆ ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत.
◆ पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.
◆ पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. 
◆ यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.
वयोमर्यादा काय असणार 
किमान वयोमर्यादा  १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे.
कोणत्या पदांना महाराष्ट्रात मंजूरी?
मिनी अंगणवाडी सेविका - 13 हजार 11
अंगणवाडी मदतनीस - 2 लाख 7 हजार
अंगणवाडी सेविका - 97 हजार 475
अशी असेल निवड प्रक्रिया
रिक्त पदे - ३२ हजार 601 पदे
अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल.
सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.
Website -  CLICK HERE
For Next Update -
पुढील अद्यावत माहिती प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
 🥏 

हेही वाचा -
तलाठी भरती तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon