Update Data In Sevarth Pranali
Update Data In Sevarth Pranali Guidelines
Instructions regarding updating of data in the service system
सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) अद्ययावत करण्याबाबत सूचना...
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४ ३ रा मजला, दालन क्रमांक ३३९, मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ दिनांकः ९ एप्रिल, २०२५
प्रस्तावना -
सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयांकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयंकाच्या संस्करणसाठी व अनुषगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे. शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणलीशीं एकात्मिककरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) सर्वसमावेशक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने खालील सात बाबींची माहिती अद्ययावत करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
१. मोबाईल क्रमांक
२. वैवाहिक स्थिती (Marital Status)
३. आईचे नाव
४. वडिलांचे नाव
५. जोडीदाराचे नाव (Spouse Name)
६. पत्ता
७. पिन कोड
शासन परिपत्रक :-
उक्त प्रस्तावनेस अनुसरुन सर्व आहरण व संवितरण अधिकारी, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई, सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उप कोषागार अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदविल्याशिवाय संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती पूर्ण करता येणार नाही.
२. सध्या ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे, त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदविणे बंधनकारक राहील.
३. सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल, २०२५ चे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रणालीमध्ये नोदविणे अनिवार्य आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोदविली नाही, तर अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल, २०२५ देय माहे मे, २०२५ चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उप कोषागार कार्यालय येथे स्विकारले जाणार नाही.
४. सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गक्रमण करावे.
५. सदर माहिती DDO_AST या लॉगीनमध्ये प्रथम अद्ययावत करून DDO लॉगीनमध्ये Worklist Payroll > Changes > Drafts of Changes या Path व्दारे Approve करावी.
६. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधून संस्करीत होईल. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माहे एप्रिल, २०२५ देय माहे मे, २०२५ च्या मासिक वेतन देयका सोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उप कोषागार कार्यालय येथे सादर करावे.
७. सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल, २०२५ देय मे, २०२५ चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उप कोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही, याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
८. सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल, २०२५ देय मे, २०२५ च्या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहरण संवितरण अधिकारी व्यक्तीश: जबाबदार राहतील.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२५०४०९१५५७४५९८०५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
शासनाचे उप सचिव
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon