Samajik Samta Saptah
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Equality Week program.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करणेबाबत.
संदर्भ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, क्रमांक सान्यावि-२०२२/ प्र.क्र.७८/बांधकामे, दिनांक ५.४.२०२२.
प्रस्तावना :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. भारतीय राज्यघटना कलम ४६ अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनः यामध्ये "राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील." असे नमूद करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील या तत्वांच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक तसेच सर्व प्रकारचे पीड़ीत आणि शोषितांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यर्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा कार्यक्रम साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी दि.८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व कार्यालयांनी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत:-
२. उपरोक्त कार्यक्रमात परिस्थितीनुसार स्थानिक स्तरावर बदल करावयाचा असल्यास तो संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण व सहाय्यक आयुक्त, समानकल्याण, यांच्या स्तरावर करता येईल.
३ 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्याची सर्वस्वी नबाबदारी ही संबंधित निल्हयातील सहाय्यक जायुक्त समानकल्याण यांची राहील. सदर कार्यक्रम यशस्वीपणे आयोजन करण्याची व पर्यवेक्षणाची जबाबदारी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांची राहील.
४ सदर कार्यक्रम अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हानिहाय एकत्रित सविस्तर अहवाल मायुक्त समानकल्याण, पुणे यांनी दरवर्षी शासनास सादर करावा,
५. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maliarashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४०४१२५८२८५५२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नादेशानुसार व नावाने.
(सो.ना. बागुल)
सह सचित्र महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: सान्यावि-२०२५/प्र.क्र.२७/बांधकामे मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon