Shaheed Shivaram Hari Rajguru
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मदिन
जन्म - २४ ऑगस्ट १९०८ (राजगुरूनगर,पुणे)
स्मृती - २३ मार्च १९३१ (लाहोर,पाकिस्तान)
भारतीय स्वातंत्र्ययज्ञात एकाच दिवशी भारतमातेच्या ज्या तीन सुपुत्रांनी, सशस्त्र क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म राजगुरूनगर ता.खेड जि.पुणे येथे झाला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते सश*स्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली.
वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या.
शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्द पध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.
सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस ह*ल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या थोर पंजाबी नेत्याला मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिनेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. ब्रिटिश पोलीस अधिकारी साँडर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी ह*ल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉल मधल्या बाँ*ब फेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू सुमारे दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते.
साँडर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्या बरोबर लाहोरच्या कारावासात फासावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे 'राजगुरूनगर' असे नामांतर करण्यात आले. या थोर हुतात्म्यास विनम्र अभिवादन नि कोटी कोटी प्रणाम.
राजगुरु
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतराय यांच्या ह*त्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजी मुळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
शहीद राजगुरु : प्रश्नमंजुषा सोडवा
यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon