DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MSBSHSE Android Mobile Application LINK

MSBSHSE Android Mobile Application LINK


MSBSHSE Android Mobile Application LINK



माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षांबाबत..
संदर्भ 
१.जा.क्र. क्र.रा.मं./परीक्षा-६/४५५५, दि.२७/११/२०२४ 
२.जा.क्र.- अविमं/माप/१९६७ दि. २५/११/२०२४
३. जा.क्र.- अविमं/माप/१९६८ दि. २५/११/२०२४

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की,
१) फेब्रु. मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके मंडळाच्या  LINK   या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१/११/२०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. याबाबतचे प्रकटन संदर्भिय क्रमांक २ अन्वये या विभागीय मंडळाचे संकेतस्थळावरुन  LINK  प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
२) मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या सोईसाठी MSBSHSE Android Mobile Application विकसित करण्यात आलेले असून ते Google Play Store मध्ये Download करण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर Mobile Application मध्ये मंडळामार्फत नुकतेच प्रसारित करण्यात आलेली इ.१० वी व ३.१२ वी फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेची वेळापत्रके, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विपयाच्या प्रश्नपत्रिका तसेच विविध परिपत्रके शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील.

हे ही वाचाल 



३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरीता मंडळाच्या प्रचलित पध्दताप्रमोणच उत्तणितेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकपात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटक यांनी घ्यावी. याबाबतचे प्रकटन संदर्भिय क्रमांक ३ अन्वये या विभागीय मंडळाचे संकेतस्थळावरुन LINK  प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
उपरोक्त तिनही बाबी आपल्या कार्यकक्षेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात व शाळास्तरावर सदर बाबीची नोंद घेण्यात यावी.


MSBSHSE Android Mobile Application LINK

विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon