DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std 11th 12th Shaikshanik Savlat Anudan Boys



विषयः ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क सवलत ही योजना सन १९५९ पासून राज्यात राबविली जाते. त्यामध्ये शासन निर्णय समाज कल्याण विभाग क्र ईबीसी / १७६३ दि १९/६/ १९६४ अन्वये सुधारित नियम अंमलात आले. शासन निर्णय शिक्षण व सेवा योजना विभाग क्रएफईडी / १०८३/ १५१६७२ / साशी ५ दि २४/८/८३ अन्वये राज्यातील शासन मान्य अनुदानित माध्यमिक शाळेतील मुलीना इ १०वी पर्यतचे (इ. ५वी ते इ. १० वी) शिक्षण मोफत करण्यात आले व शासन निर्णय शिक्षण व सेवा योजन विभाग एफईडी /१०८४/२५६८/साशी ५ दि ६/२/१९८७ च्या निर्णयन्वये इ १२. वी पर्वत मुलीना मोफत करण्यांत आले त्यानंतर शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र एफईडी / १०९६ प्रक्र/१९७८/९६ साशी ५ दि १३/६/९६ अन्वये इ १ते १०वी पर्यंत सर्वाना निःशुल्क शिक्षण योजना सुरू करण्यांत आल्याने उपरोक्त योजनेचा लाभ इ ११वी व १२वी मधील विद्यार्थी घेतात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून शासनाने शासन निर्णय ई बी सी १०९२/ १२२१/ साशी ५ दि.३० मार्च १९९३ अन्वये ई बी सी योजनेखाली फी सवलतीबाबतची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु १५०००/- निश्चित केलेली आहे. ३० मे २०१५ च्या शासननिर्णयान्वये सदरची उत्पन्न मर्यादा रू. ३००००/- वरून १००००० करण्यात आलेली आहे.
इ.११/१२ वी अनुदानित
विनाअनुदानित ११/१२ वी
किमान कौशल्य / अनु
किमान कौशल्य / विना
७७ प्रति वर्ष
प्रति वर्षे २५०
प्रति वर्ष १००
प्रति वर्ष २५०
ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता १९ वी १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रिपणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमुन्यात सादर करण्यात येत आहे. सोबतः-
१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना प्रपत्र-१
२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी / मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी भरावयाचा नमूनाः-प्रपत्र-२
३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३
४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म नमूना प्रपत्र-४
५) ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (मुलांना) शैक्षणिक सवलत लेखाशिर्ष-२२०२१४७४ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती. फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र-५
६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. नमूने-प्रपत्र-अ,ब,क,ड.ई यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे
सोबतः- विहित नमूने जोडले आहेत.


(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय, (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे

प्रतः- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, पुणे
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे
जा.क्र./शिसंयो/यो-१-३०२/११-१२ वी मुलांना शै.स./कार्यपध्दती/01126/सुधारित
दिनांक :- ०६.०५.२०२४
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon