स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी करून घेणे
दिनांक २१/१०/२०२४
विषय : स्टार्स प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमात इयत्ता ६ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्याबाबत ....
उपरोक्त विषय संदर्भानुसार STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत NEP २०२०,NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes) विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी दिनांक ०६/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता झूम प्लॅटफॉर्मद्वारे शिक्षण क्षेत्रातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित अधिकान्यऱ्यांना सदर उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
मार्गदर्शक व्हिडिओ पहा
तसेच सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी व हॅकॅथॉन उपक्रमासंदर्भात सक्षमपणे कार्यवाही करण्यासाठी राज्य स्तरावर दिनांक २५ व २६ सप्टेबर २०२४ या कालावधीत तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता / वरिष्ठ अधिव्याख्याता नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
सदर उपक्रमात आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमातील विषयांतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे. यासाठी प्रस्तुत परिषदेमार्फत Hackathon
Registratrion LINK नोंदणी लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक परिषदेच्या साईट वर अपलोड करण्यात आली आहे. सदर लिंक ही दिनांक १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी खुली राहील. सदर नोंदणी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. सहभागी होण्याबाबत सगळ्या सूचना लिंकवर देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान १००० नोंदणी होणे अपेक्षित आहे. यास्तव आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता ६ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमायावत अवगत करून मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे सदर उपक्रमा- संदर्भात काही शंका असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी.
Hackathon Registratrion LINK
FAQ (frequently asked questions)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हॅकॅथॉन - २०२४-२५
1. हॅकॅथॉनमधे सहभागी होण्यास प्रतिकृती तयार करण्यासाठी विषय (themes) कोणते आहेत?
उत्तर -
• आरोग्य
• कृषी
• वाहतूक व दळण वळण
• दर्जेदार शिक्षण
• पर्यावरणपूरक जीवन शैली
• नागरी विकास रचना
• पर्यटन
• संगणनीय विचार
• स्वच्छता
• अन्न आणि पोषण
• परवडणारी व स्वच्छ उर्जा
•लिंग समभाव
• सांस्कृतिक वारसा
• प्रदूषण
• डिजिटल सुरक्षा
2. हॅकॅथॉनमधे कोणत्या इयत्तेतील विदयार्थी सहभागी होऊ शकतात?
उत्तर - इयत्ता ६ ते ८ मधील विदयार्थी
3. विद्यार्थ्यांना वैयक्तिक सहभागी होता येईल की गटात ?
उत्तर - गटात
4. एका गटात किती विदयार्थी सहभागी होऊ शकतात?
उत्तर - २ विदयार्थी
5. एका शाळेतून किती प्रतिकृती सादर करता येतील?
उत्तर - जास्तीत जास्त ३
6. हॅकॅथॉनमधे कोणत्या व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होऊ शकतात?
उत्तर -
१. स्थानिक स्वराज्य संस्था
२. शासकीय
३. शासकीय अनुदानित
7. हॅकॅथॉनसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कोणी करायची?
उत्तर - शिक्षकांनी
8. नोंदणी करण्यासाठी कोणती लिंक आहे?
उत्तर -
Hackathon Registratrion LINK
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शामन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिपद, महाराष्ट्र पुणे
जा.क्र. रा. शैसंप्रथम / व्यभावरामुवि / Hackathon /२०२४-२५/०८।०९
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon