NCC Increase Rate of Washing Polishing allowance to Students
NCC Increase Rate of Washing Polishing allowance to Students of Rashtriya Chhatra Sena
National Cadet Corps Scheme Regarding the increase in the rate of washing and polishing allowance given to the students of Rashtriya Chhatra Sena
NCC Increase Rate of Washing Polishing allowance to Students of Rashtriya Chhatra Sena
राष्ट्रीय छात्रसेना योजना. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना देण्यात येणाऱ्या धुलाई व चकाकी भत्त्याच्या दरात वाढ करण्याबाबत.
दिनांक : ११ सप्टेंबर, २०२४.
प्रस्तावना :-
शिक्षण संस्थेतील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सन १९४८-४९ मध्ये राष्ट्रीय छात्र सेना दलाची देशव्यापी स्वरुपात स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय छात्रसेनेची तरतूद व रचना करण्याच्या दृष्टीने "राष्ट्रीय छात्रसेना कायदा- १९४८" हा अधिनियम करण्यात आला आहे. राष्ट्रीय छात्र सेना योजनेसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध भत्ते दिले जातात. त्यानुसार संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये धुलाई व चकाकी भत्यामध्ये रू. १०/- वरून रू. ३०/- इतकी वाढ करण्यात आली आहे. आता, केंद्र शासनामार्फत सदर भत्याच्या दरात रू. १०/- वरून रू. ४१/- इतकी वाढ केल्याप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या धुलाई व चकाकी भत्यामध्ये रू. ३०/- वरून रू. ४१/- इतकी वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या धुलाई व चकाकी भत्यामध्ये कनिष्ठ विभागातील छात्र सैनिकांना ८ महिन्यासाठी व वरिष्ठ विभागातील छात्र सैनिकांना ६ महिन्यासाठी रू. ३०/- वरून रू. ४१/- इतकी प्रतिमाह वाढ करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर वाढीव भत्याचे दर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहतील.
२. राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांच्या धुलाई व चकाकी भत्यामध्ये सुधारीत दराप्रमाणे होणारा खर्च "मागणी क्र. ई-३ २२०४, क्रीडा व युवक सेवा, १०२, विद्यार्थ्यांकरिता युवक कल्याण कार्यक्रम
(०१) (०१) राष्ट्रीय छात्रसेना (२२०४-००१६-२१) पुरवठा व सामग्री" या लेखाशीर्षातंर्गत दर्शविण्यात यावा व तो प्रतिवर्षी उपलब्ध होणाऱ्या तरतूदीतून भागविण्यात यावा. उपरोक्त योजनेसंदर्भात प्राप्त होणाऱ्या निधीसाठी संबंधीत समादेशक अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेना यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ९९६/व्यय-५. दि. ०२.०९.२०२४ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०९१११२०२३९८०२१ आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(कविता तोंडे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : राछासे-२६२२/प्र.क.९९/क्रीयुसे-३ मंत्रालय विस्तार, मुंबई
वाचा :-
१. शासन निर्णय क्र. एनसीसी- १७८९/४३/(४२६/९८)/माशि-५. दि. २४.०८.१९९८.
२. शासन निर्णय क्र. राछासे-२६२२/प्र.क्र.९९/क्रीयुसे-३, दि. ३१.०१.२०२४.
३. केंद्र शासन, रक्षा मंत्रालयाचे पत्र क्र. No-४/२३/२०२१-D (GS-VI), दि. ०५.०१.२०२४.
४. अतिरिक्त महासंचालक, एनसीसी, मुंबई यांचे पत्र क्र. ८०००/NCC/Accts/२०२४-२५ /SGF, दि. १०.०७.२०२४.
५. सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे पत्र क्र. राछासे/सापु-घुचम/२०२४-२५/ का-५/११६०, दि.२६.०७.२०२४.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon