DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

7th Pay Commission Vetan Truti Nivaran

7th Pay Commission Vetan Truti Nivaran GR



शासन निर्णय क्रमांक : वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, मंत्रालय, मुंबई

दिनांक :- २७ डिसेंबर, २०२४

पहा :-

१. शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.१६.०३.२०२४

२. शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.११.०९.२०२४

३. शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.२६.११.२०२४

प्रस्तावना :-

सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरिता वरील १) येथील आदेशान्वये वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्र.३ अन्वये दि.३०.११.२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. समितीस अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली असून, समितीचे कामकाज अद्याप बाकी आहे. त्यामुळे उर्वरित कामकाज पुर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरिता नियुक्त केलेल्या वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दि. ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४१२२७१२४०४००१०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.




(वि.अ. धोत्रे) उप सचिव, वित्त विभाग

Also Read 👇 

दिनांक :- ११ सप्टेंबर, २०२४

प्रस्तावना :-
सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे.

    सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्यांची (दि.१५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत) मुदत देण्यात आली आहे. समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे. त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय : :-

    सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
    सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४०९१११४४७२१२००५ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

GR PDF Copy LINK

VINAYAK ARVIND DHOTRE
(वि.अ. धोत्रे) उप सचिव, वित्त विभाग

सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ मुदतवाढ देण्याबाबत...
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ 
पहा :- शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.१६.०३.२०२४
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon