MAHATET Exam 2024 Online Apply Link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४
प्रसिध्दीपत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) 2024 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पेपर क्र. 1 व 2: अंतिम निकालाबाबत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर । (इ. 1 ली ते 5बी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवून घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर। व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल,
MAHATET RESULT LINK
दिनांक: 13/2/2024
टिकाण: पुणे
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पेपर I (इ. १ ली ते ५ वी) पेपर II (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पेपर 1 व पेपर II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१.०१.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
☝️ उमेदवारांनी लॉगिन केल्यानंतर शेवटच्या पर्यावर क्लिक करा
या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटि/आक्षेप असल्यास
त्रुटि/आक्षेप लिंक
या संकेतस्थळावर दिनांक ०१.०२.२०२५ ते दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधुन ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे. दिनांक ०६.०२.२०२५ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
स्थळ : पुणे
दिनांक : ३१.०१.२०२५
हेही वाचाल
प्रसिध्दीपत्रक
दि. 02/01/2025
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024
परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024
अंतिम उत्तरसूची
अंतिम उत्तरसूची
पेपर १ (१ ली ते ५ वी)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित - विज्ञान)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले त्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची
MAHATET RESULT DECLARED LINK
अंतरिम उत्तरसूची
पेपर १ (१ ली ते ५ वी)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित - विज्ञान)
पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र)
MAHATET EXAM Admit Card 2024
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ प्रवेश पत्र विद्यार्थी लॉगिन मध्ये उपलब्ध झालेले आहेत परीक्षार्थींनी आपले प्रवेश पत्र खालील लिंक ला स्पर्श करून प्राप्त करून घ्यावी डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी लॉगिन लिंक.
परीक्षा प्रवेश पत्रे ऑनलाइन प्रिंट करण्याचा कालावधी २८ ऑक्टोंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४
लिंक 👇⏬
MAHA TET परीक्षा मागील वर्षाचा नमुना प्रश्नपत्रिका संच ⏬
पासवर्ड विसरलात Password Forget LINK
हेही अवश्य वाचाल 👇
दिनांक: 11/10/2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर - 2024
शुद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर दिवशी होणाऱ्या पेपरचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे.
अ.क्र १. पेपर नाव शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1
दिनांक व वेळ १०/११/२०२४ स. १०.३० ते दु.०१.००
अ.क्र २. पेपर नाव शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II
दिनांक व वेळ १०/११/२०२४ दु. २.३० ते सायं. ०५.००
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४
Also Read 👇
MAHATET 2024 Online Apply Link
Maharashtra Teacher Eligibility Test 2024 Online Apply Link
दिनांक: 30/09/2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024
प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन २०२४ चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक ०९/०९/२०२४ रोजी सुरु केले असून आवेदनपत्र दिनांक ३०/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ पर्यंत भरु शकतात. परंतु परीक्षा शुल्क दिनांक ०३/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत करु शकता,
(अनुराको ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Also Read
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे
जा.क्र.मरापप/बापवि/२०२४/१०१,
दिनांक:-०९/०९/२०२४
प्रति,
१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०००३२
२) मा. विभागीय प्रसिद्धी उपसंचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण
३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०००३२
४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई - २०
५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/जळगांव/रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक
६) सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी
७) मा. वृत्तपत्र संपादक
विषय : "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४" आयोजनासंदर्भात मोफत प्रसिध्दी देणेबाबत.
महोदय,
महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४"चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येत आहे.
परीक्षेबाबत विनामूल्य प्रसिध्दी देण्याचे निवेदन सोबत जोडले आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
(संजयकुमार राठोड)
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे.
दिनांक: 09/09/2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024
प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.
इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
३. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३.०० PM
४. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM
उपायुक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (MAHATET)
जाहिर प्रकटन
प्राचमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) प्रविष्ट होणेकरिता शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थीकडून अर्ज मागविणेबाबत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ वेळापत्रक
कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काजून घेणे २८/१०/२०२४ ते १०/११/२०२४
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १०.३० AM ते १३,०० PM
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ
दि.१०/११/२०२४ वेळ १४.०० PM ते १६.३० PM
काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारासाठी अद्यायावत
माहिती परिषदेच्या
या संकेतस्थळापर प्रसिद्ध केली जाईल,
टिप:
१. परीक्षाविषवक सर्व जसे आवेदनपत्र भराणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट
वर उपलब्ध आहे.
त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा,
२. अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.१० वी, इ.१२ वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि
बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी, स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटों, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतः चे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवाची
३. सदर परीक्षेत प्रचिष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमागध्यनी क्रमांक अचूक द्यावा व जलन करुन ठेवावा, पेपर (प्राथमिक स्तर) व पेपर ।। (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेस्राठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्णा प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच विकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही
४. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, परीक्षेचे शुल्क ऑनलाईन, बैंकिग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल, (चलनाद्वारे ऑनालाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रालील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्यावाचतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही,
५ अर्ज स्वीकारण्याच्या ऑतम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल, विविध पद्धतीने अर्ज सादर
केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही
६. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसंच, आवेदनपत्र कागदपत्रे
(प्रमाणपत्रे) गहशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही,
७. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहुन उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अवता उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
८. एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.
९. सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादोमध्ये आपले नाव आहे किवा नाही? याबाबत खात्री करुन वस्तूनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी, आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहिल. तसेच या २०१८ व २०१९ गादी मध्ये समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात घेईल याची उमेदवारांनी गांभिर्यान नोंद घ्यावी.
१०. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सबै उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे.
हेल्पलाईन नंबर १०२८४७२६८१/८२/८३
दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता येळ सकाळी १०.०० ते सायं ६,००
माहिती स्त्रोत
सविस्तर माहितीकरिता संकेतस्थळ
स्थळ : पुणे
दिनांक : ०१/०९/२०२४
उपायुक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon