DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Seat Reserved Divyang Passengers In Bus दिव्यांगांना एसटी बस मध्ये सीट राखीव

Seat Reserved Divyang Passengers In Bus 


दिव्यांगांना एसटी बस मध्ये सीट राखीव

Seat Reserved For Divyang Passengers In ST Bus

दिव्यांगांना एसटी बस मध्ये सीट राखीव
Seat Reserved For Disabled In ST Bus

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

वाहतूक खाते, मुंबई


क्र. राप/वाह/सवलत / ३३५३ परिपत्रक क्र. १०/२०२४

दिनांक:-०२/०९/२०२४

प्रति,

प्रादेशिक व्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र. १/२/३/४

मुख्य अभियंता (सं.व.वि.]

मध्यवतीं कार्यशाळा, दापोडी- पुणे

विभाग नियंत्रक,

रा.प.मुंबई/पालघर/रायगड(पेण)/रत्नागिरी/सिंधुदूर्ग/ठाणे/नाशिक/धुळे/जळगांव/अहमदनगर/पुणे/कोल्हापूर/सांगली सातारा सोलापूर/औरंगाबाद/बीड/जालना/लातूर/नांदेड/अमरावती/उस्मानाबाद/परभणी/नागपूर/भंडारा/चंद्रपूर/वर्धा/गडचिरोली/ अकोला / यवतमाळ / बुलडाणा विभाग.
यंत्र अभियंता [चालन] रा.प. विभागीय कार्यशाळा, बारामती/श्रीरामपूर.

विषय :- दिव्यांग प्रवाशांना रा.प महामंडळाच्या ताफ्यातील विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत.

संदर्भ :- परिपत्रक क्र. १५/२०२३, क्र. राप/वाह/सवलत/५४३१, दि.२२.१२.२०२३.

दिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेयावत तसेच सदस्ची आसने प्रवासादरम्यान लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देणे याबाबतची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने आपणांस पुढील प्रमाणं सुचना देण्यात येत आहेत.

१. दिव्यांग प्रवाशांस खालीलप्रमाणे रा.प.बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत.

निमआराम ३.४.५.६

ई-शिवाई ३,४

शिवशाही ३,८,५,६

विना वातानुकूलित शयनयान ३,४,५,६

ईव्ही-९ भी. ३५ आसनी ३,४
 
विना वातानुकूलित शयन आसनी ३०.३१

शिवनेरी/ अनशिवनेरी १३,१४


२. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर / थांव्यावर सदर आसन प्रवासाकरीता उपलब्ध करुन देणं,

३. आरक्षित / अनारक्षित बसेसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपी राखीव ठेवण्यात यावे. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करुन देण्यात यावीत.

४. दिव्यांग लाभार्थ्यांस आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आनमे आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यास सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल.

गांधी दिशांग लाभार्थ्यांम पवामा दरम्यान त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने उपलब्ध

६. दिव्यांग व्यक्तींना रा.प.वसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प.बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान | उतरण्याचे ठिकाण येताच रा.प. वाहकाने त्याबाबतची उ‌द्घोषणा करुन उतरण्याचे ठिकाण आल्याचाबत दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे.
🙋

१७. दिव्यांग प्रवाशांचा रा.प. प्रवास सुखकर व्हावा या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना करावी.

८. सद्यस्थितीत दिल्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी / जनशिवनेरी बसेसमध्ये

आसने राखीव ठेवण्यात येत आहेत. सदर वसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता सोवत

'जोडण्यात येत आहे. "." इतर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.

सदरचा बदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी वस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी ही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसमध्ये आसन व्यवस्था गखीव ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलब्ध करुन देण्यात यावीत. सदर बाबतची कार्यवामी परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

तरी उपरोक्त प्रमाणे बदलाबाबतची माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थापक यांना देण्यात यावी. सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. आपणाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.
खालील ओळीला स्पर्श करून आपण सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता 



सोल-एकूण ०२ आरेखन तक्ते
महाव्यवस्थापक (वाहतूक)
दिव्यांगांना एसटी बस मध्ये सीट राखीव


दिव्यांगांना एसटी बस मध्ये सीट राखीव



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon