DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Tantrasnehi Shikshak Adhikari Yadi SCERT

Tantrasnehi Shikshak Adhikari Yadi SCERT

Tantrasnehi Shikshak Adhikari Yadi

राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक व अधिकाऱ्यांची यादी तयार करणेबाबत

उपरोक्त विषयास अनुषंगून संदर्भ क्र. १ ते ४ नुसार, परिषदेतील आयटी विभागाशी संबंधित विविध स्तरावरील ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षणासाठी तसेच विभागाच्या इतर तंत्रस्नेही व अन्य कामकाजाकरिता जास्तीत जास्त शिक्षक / अधिकारी यांना संधी देता यावी म्हणून राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक व अधिकाऱ्यांची यादी (एसआरजी गट) बनविण्याबाबत मा. संचालक, प्रस्तुत परिषद यांच्याडून आयटी विभागास सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या कार्यालयातील आयटी विभाग प्रमुख वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यांची सदर कामी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. हे नोडल अधिकारी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान ३ तंत्रस्नेही शिक्षकांची निवड करतील.

शिक्षक निवडत असताना खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी,

१) ते शिक्षक तंत्रस्नेही आहेत. (मोबाईलचा वापर, छोटी-मोठी व्हिडीओ शुटींग एडीट करणे, ईमेल,

व्हाट्सप सारख्या बाबींचा वापर,

२) अध्ययन-अध्यापनात ते आयसीटीचा वापर करण्यास सक्षम आहेत.

३) काही शिक्षक या बाबत अत्यंत सक्षम असतात परंतु सहसा स्वतःहून पुढे येत नाहीत अशा शिक्षकांचे थोडक्यात समुपदेशन करून ते तयार झाल्यास; त्यांचा यादीत समावेश करावा.

४) उपरोक्त क्र. ३ मध्ये उल्लिखितच्या उलट काही व्यक्ती याबाबत तेवढ्या क्षमता नसतानाही स्वतःहून यामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करतात, अशा वेळी त्यांच्यापेक्षा सरस पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांच्या नावाचा विचार करण्यात येवू नये.

५) जास्तीत जास्त सक्षम तंत्रस्नेही शिक्षक त्यांची इच्छा असल्यास यादीत सामील होतील ही बाब विचारात घ्यावी.

६) एखाद्या अशा शिक्षकाची या कामी सहभागी होण्याची इच्छा आहे ज्यांच्या अंगी उपरोक्तनुसार क्षमता आहेत परंतु त्यांनी या अगोदर कोणत्याही स्तरावर प्रशिक्षणार्थी किंवा प्रशिक्षक म्हणून कामकाज केले नाही त्यांचाही यादीमध्ये समावेश करता येईल.

उपरोक्त बाबत नोडल अधिकारी स्वतः, इतर शिक्षक, केंद्रप्रमुख किंवा अन्य स्रोताकडून खात्री करून घेवू शकतात. सदर निवड करण्यासाठी उपलब्ध पर्यायांतून सर्वोत्कृष्ट पर्याय निवडावा. याबरोबरच जिल्ह्यातील डायटसह कोणत्याही मूळ शासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागात कार्यरत असणारे तंत्रस्नेही अधिकारी या कामी स्वतःहून सहभागी होत असल्यास त्यांचाही या यादीत समावेश करावा. याबाबत संबंधितांशी डायट स्तरावरून आवश्यक पत्रव्यवहार करण्यात यावा.

उपरोक्तानुसार तंत्रस्नेही शिक्षक व अधिकारी यांची यादी खालील प्रारुपात तयार करावी,

जिल्हा
नोडल अधिकारी -
पद -
मोबाईल -
जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची यादी २०२४-२५

अ.क्र.
शिक्षकाचे/अधिकाऱ्याचे नाव
पदनाम व कार्यालय (केंद्राच्या नावासह)

तालुका
मोबाईल
ईमेल

ही यादी स्वाक्षरीत करून (सॉफ्ट कॉपी एक्सेल प्रारूपासह 📧 LINK मेल आयडीवर दिनांक ०५/०८/२०२४ पर्यंत न चुकता मेल करावी.

Circular pdf Copy Link


उपसंचालक, 
आयटी विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, 
पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी/तंत्रस्नेही/२०२४/०३६७५

दिनांक: ०१/०८/२०२४

प्रति,

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

विषय : राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक व अधिकाऱ्यांची यादी तयार करणेबाबत

तंत्रस्नेही शिक्षक व अधिकाऱ्यांची यादी तयार करणे

List of Tantrasnehi Teachers and Officers

संदर्भ :- १) CIET, NCERT, नवी दिल्ली यांचे पत्र दि. १६ जुलै, २०२४.

२) आयटी विभागाची मंजूर टिपणी दिनांक १८/०७/२०२४

३) प्रस्तुत परिषदेचे पत्र जा क्र. SCERT/IT/Syber Security/२०२४-२५/०३४८५ दिनांक: १९/०७/२०२४

४) मा. संचालक, प्रस्तुत परिषद यांच्या सुचना दिनांक २४/०७/२०२४
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon