Relaxation In Office Hours to Diyanga GR
Divyang karmchari velet savlat
निःसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (Persons With Disabilities) कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत.
तारीखः १६ जुलै, २०१३
Relaxation in office hours to Government employees Persons With Disabilities
प्रस्तावना -
बृहन्मुंबईतील राज्य शासकीय कार्यालयातील निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयीन वेळेवर हजर राहणे पुष्कळदा कठीण होत असल्यामुळे वरील शासन निर्णयाद्वारे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात आलेली आहे. सदर सवलत राज्यातील अन्य जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे :-
शासन निर्णय -
राज्यातील अन्य जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील निः समर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयात वेळेवर हजर राहणे पुष्कळदा कठीण होत असल्यामुळे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात येत आहे.
🙋♿👇
महाराष्ट्र शासन निर्णय
२३ जुलै २०२४
दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू हा शासन निर्णय आपणास पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला या स्पर्श करा
२. वरील सवलत घेऊ इच्छिणाऱ्या निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) ते किमान ४० टक्के कायमचे / अंशिक अपंगत्व असल्याबाबत त्या जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय रूग्णालय यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाचा शासकीय कर्मचाऱ्याने किमान ४० टक्के कायमचे / अंशिक अपंगत्व असल्याचा दाखला सादर केल्यास तो वरील शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली अर्ध्या तासाची सवलत देण्यास ग्राह्य धरण्यात यावा. ३. वरीलप्रमाणे निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) सवलत देण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३०७१६१७४४३७९७०१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
🌐👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध या ओळीला स्पर्श करा 👈
(डॉ.पी.एस.मीना)
अपर मुख्य सचिव
(प्र.सु.र. व का.)
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः समय-२०१३/प्र.क्र.२०/१८ (र. व का.) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई तारीखः १६ जुलै, २०१३
वाचा -
१) शासन निर्णय क्रमांकः एमआयएस-१०८१/७३/१८, दिनांक १४/८/१९८१,
२) शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-१०८५/२३/१८, दिनांक ३०/७/१९८५,
३) शासन निर्णय क्रमांकः समय-१०९१/प्र.क्र.३५/१८ (र. व का.), दिनांक ३०/७/१९९१.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon