EWS Candidates 5 persent Relaxation in CTET Marks
Candidates belonging to Economically Weaker Sections (EWS) who passed CTET 5% relaxation in marks in said examination
महोदय,
शासन निर्णय, दिनांक ०७.०२.२०१९ अन्वये राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. यामधील परिच्छेद क्र. ३ अन्वये, इयत्ता १ ली ते ८ वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरीता अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या जमाती-ब/भटक्या जमाती-क/ भटक्या जमाती-ड/ इतर मागास प्रवर्ग/विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग / खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक/ दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णय दिनांक ७.२.२०१९ मधील परिच्छेद
३ मध्ये केंद्रशासन व राज्यशासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील (EWS) उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये ५ % सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे यासंदर्भात विविध संघटनांची व लोकप्रतिनिधीची निवेदने प्राप्त होत आहेत.
हेही वाचा 👉 यांना दिली जाते शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (TET EXAM) १५ टक्के गुणांची सवलत वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन आयोजित अथवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट
याबाबतची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्यं नमूद आहे.
तसेच संदर्भ क्र. १ येथोल शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मध्ये देखील याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आली आहे.
०३. यास्तव स्पष्ट करण्यात येते की, सदर शासन निर्णयातील परिच्छेद ३ येथील पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेकरीता लागू आहे.
Circular pdf Copy Link
आपला,
(म.मि. काळे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
मुंबई
क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र.क्र. १५२/टिएनटि-१,
दिनांक: ०९ जून, २०२३.
प्रति,
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय: शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र. ३ संदर्भ: संदर्भात स्पष्टता आणणेबाबत.
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९
२. शासन अधिसूचना, असाधारण क्र.४०९, दि.२६.११.२०१९
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon