महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,, पुणे
जा.क्र. आशिका-2024/आस्था-क/प्राथ. 106/शालेय वि.सुरक्षा/5207
दिनांक : 25/08/2024
विषय : राज्यातील सर्व शाळांमधील विद्याथी/विद्यार्थीनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत.
संदर्भ: शा.नि.क्रमांक सुरक्षा-2024/प्र.क्र. 243/एस.डी.-4, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, दिनांक 21 ऑगस्ट 2024
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, गेल्या काही दिवसांमध्ये शालेय विद्याची व विद्यार्थीनीच्या संदर्भातील शारीरीक गुन्ह्यांबाबत राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयर दाखल होत आहेत.
2/- अशाप्रकारे एफआयआर दाखल झाल्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडून तातडीने प्राप्त करुन घ्यायों व खालोल दिलेल्या गुगल लिकमधील तक्यात रोजच्या रोज न चुकता भरावी.
3/- आपले जिल्ह्यातील सर्व क्षेत्रिय यंत्रणा/अधिकारी/कर्मचारी यांना अशा घटनांची माहिती पोलीस स्टेशनकडून प्राप्त करुन घेणेबाबत तात्काळ सुचित करावे.
4/- ज्या संस्था/शाळांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन केले नसेल तसेच अशा प्रकारच्या घटना दडपण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचेवर कठोरतम कारवाई करावी आणि त्याचा उल्लेख शेरा रकान्यात करावा. तसेच अशा प्रकारच्या प्रकरणांच्या हाताळणीत हयगय केल्याचे दिसून आल्यास संबंधित क्षेत्रिय अधिकान्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(सूरज मांद्रे, भा.प्र.से.)
आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
1. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), (सर्व)
2. प्रशासन अधिकारी (मनपा), (सर्व)
3. शिक्षण निरीक्षक, (सर्व)
शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषय उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...
शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र.आस्था-अ/प्राथ-१०६/वि.सु/२०२४/5143
दिनांक : २२.०८.२०२४
विषयः शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषय उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...
उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येत आहे की, अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यामध्ये घडलेल्या काही अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाद्वारे संदर्भीय शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा स्थानिक पातळीवर काळजीपूर्वक घेतली जाईल, या निर्णयात नमूद उपायोजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने केली जाईल याची खात्री करणे व आवश्यकते प्रमाणे यासंबंधात सुधारणा करणे याबाबतची जबाबदारी शिक्षण विभागातील विविध पातळीवरील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे.
प्रस्तुत शासन निर्णयानुसार मुख्यत्वे सर्व प्रकारच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, त्याचे फुटेज नियमितपणे तपासणी करणे, यासाठी शाळांमध्ये कंट्रोल रूमची उभारणी करणे, शिक्षकेतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यासाठीची कार्यपद्धती, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदी व शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन मुद्द्यांवर कार्यवाही करावयाची आहे.
संदर्भीय शासन निर्णयामध्ये वर नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत करावयाच्या कार्यवाहीसंबंधी तपशीलवार विशद करण्यात आलेले आहे, तरी सर्व जिल्हा, तहसील, मनपा व न.पा. या शहरी विभागातील सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, यांनी तातडीने या मुद्द्यांचा आढावा घ्यावा, आपापले कार्यक्षेत्रामध्ये अशा सुरक्षा विषयी उपाययोजना संबंधी जनजागृती करावी, पालकांना व अन्य समाजसेवी घटकांना यामध्ये सकारात्मक रीतीने सहभागी करून घ्यावे,
याबाबतचा त्यांच्या क्षेत्रातील विभागीय पातळीवरचा आढावा सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तातडीने घेऊन सोबतचे प्रपत्र अ मध्ये संबंधित संचालक व आयुक्त कार्यालय यांच्याकडे येत्या ४ दिवसांत अहवाल सादर करावा.
यासंदर्भात नजीकच्या काळात व नियमितपणे इकडून आढावा घेण्यात येईल.
(दिलीप ज्ञा. जगदाळे)
शिक्षण सहसंचालक
(प्रशासन, अंदाज व नियोजन) आयुक्त (शिक्षण) कार्यालय, म.रा., पुणे
प्रति,
१. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), संचालनालय, म.रा., पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालनालय, म.रा., पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा (सर्व)
५. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (प/उ/द)
६. प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा., नगरपालिका (सर्व)
संदर्भ: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा. नि. क्र. सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२४३/एस.डी.-४ दि. २०.०८.२०२४
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon