DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Aapale Sarkar Seva Kendra In Colleges GR


Starting Aapale Sarkar Seva Kendra In Colleges GR

राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत...

शासन निर्णय

दिनांक २० ऑगस्ट, २०२४.

प्रस्तावना : -

उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या CSC २.० योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, सदर आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापन, सनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्र.२ येथील पत्रान्वये अहमदनगर जिल्ह्यातील १० तालुक्यामधील १५ महाविद्यालयांत प्रायोगिक तत्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

शासनाचा सदर निर्णय हा राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला असून, अशा प्रकारे महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबत राज्यातील इतर ठिकाणांवरुनही मागणी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव, सदर निर्णय राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याबाबतची मागणी करण्यात येईल, त्या त्या महाविद्यालयांना उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ येथील दि.१९.०१.२०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीस अनुसरुन आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजूरी देतांना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सदरील कार्यवाही करतांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या. (महाआयटी), मुंबई यांचेशी तांत्रिक सहाय्याकरीता समन्वय साधावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०८२०१२०४३१८६०१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सुदाम आंधळे) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) शासन निर्णय क्र. संकीर्ण-१७२४/प्र.क्र.४५/मावतं हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई, ४०००३२ 

दिनांक २० ऑगस्ट, २०२४.

संदर्भ :
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मातंसं-१७१६/प्र.क्र.५१७/३९, दि.१९.०१.२०१८
२) शासनाचे समक्रमांकाचे दि.३१.०७.२०२४ रोजीचे पत्र.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon