DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Student Portal HM Login Division Updates


महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, पुणे

क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/४१८४

दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२४

प्रति,

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
Student Portal HM Login Division Updates

विषय : स्टुडन्ट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगीन मध्ये तुकड्यांचे व्यवस्थापन अपडेट करून घेणेबाबत.....

Sanch Manyata Draft
संदर्भ : 
१) शासन निर्णय क्रः एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२ दिनांक २८ जानेवारी २०१९
२) दिनांक २८/०६/२०२४ रोजीचे शासन पत्र

    उपरोक्त संदर्भ क्रमांक २ नुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संच मान्यता २०२३-२४ हि ३० सप्टेबर २०२३ रोजीच्या पटापैकी आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संदर्भ क्रमांक १ च्या आकृतीबंधान्वये एकूण मंजूर पदाच्या मर्यादेत करण्याचे सूचित केलेले आहे. शासन निर्णय संदर्भ क्र.१ नुसार राज्यातील शिक्षकेत्तर संच मान्यता २०२३-२४ जनरेट करत असताना राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळेतील अनुदानित व अंशतः अनुदानित तुकड्यातील ३० सप्टेबर २०२३ रोजीच्या पटापैकी आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संदर्भ क्र. १ मध्ये निर्देशित केल्यानुसार करण्याचे आहे. राज्यातील खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संच मान्यता सन २०२३-२४ जनरेट करत असताना असे निदर्शनास आलेले आहे कि, ज्या शाळा/ तुकड्या विनाअनुदान वरून अंशतः अनुदानवर आलेल्या आहेत. अश्या शाळेनी आपल्या शाळेचे व्यवस्थापन शिक्षणाधिकारी लॉगीन मधून बदलून घेतलेले आहे. परंतु स्टुडन्ट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगीन मध्ये मात्र तुकड्याचे व्यवस्थापन अद्याप विना अनुदानित ठेवलेले आहे. सदर स्टुडन्ट पोर्टलवरील तुकड्याचे व्यवस्थापन अद्याप अपडेट न केल्याने सदर शाळेच्या तुकडीची स्टुडन्ट पोर्टलवरील व्यवस्थापनची नोंद विनाअनुदानित असल्याने त्या तुकडीतील विद्यार्थी संख्या शिक्षकेत्तर संच मान्यतेस विचारात घेतले जाणार नाही.

राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक यांनी आपल्या विभागातील ज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / तुकडी ह्या विनाआनुदानित वरून अंशतः अनुदानवर (२०,४०,६०,८०,१०० टक्केवर) आलेल्या आहेत त्या सर्व शाळा/ तुकड्याचे स्टुडन्ट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगीन मधील तुकड्याचे व्यवस्थापन प्रकार तात्काळ दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ पूर्वी अपडेट करून घ्यावे. ज्या शाळांकडून तुकड्यांचे व्यवस्थापन प्रकार शाळेच्या स्टुडन्ट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉगीन मधून अपडेट केले जाणार नाही.अशा शाळांच्या संच मान्यतेमधील शिक्षकेतर मंजूर पदांमध्ये तफावत असल्यास सदर प्रकरणी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.


(संपत सूर्यवंशी)
शिक्षण संचालक, 
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत आवश्यकत्या कार्यवाहीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

/- यांनी आपल्या विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद यांचेकडून उपरोक्त निर्देशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करणेबाबत निर्देश देऊन त्याबाबतचा दररोज आढावा घेवून एकत्रित आढावा सादर करावा.

Circular pdf Copy Link

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon